राष्ट्रीय

August 8, 2024 6:39 PM

views 25

उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख नागरिकांची नोंदणी – मंत्री जीतन राम मांझी

उद्यम पोर्टलवर ४ कोटी ८० लाख जणांनी नोंदणी केली आहे असं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी सांगितलं. उद्यम पोर्टल, पीएम विश्वकर्मा योजना आणि या क्षेत्रातील विविध उपक्रमांद्वारे २० कोटी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचही त्यांनी म्हटलं आहे. क्रेडि...

August 8, 2024 3:58 PM

views 47

लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर

लोकसभेत आज वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलं. यात वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करुन राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. ...

August 8, 2024 8:12 PM

views 32

भारतीय रिझर्व बँकेचं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर

भारतीय रिझर्व बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना सलग नवव्यांदा रेपो दर साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थायी ठेवींवरचा व्याज दर सव्वा सहा टक्के, तसंच मुदत ठेवींवरचा व्याज दर आ...

August 8, 2024 8:18 PM

views 43

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आज सकाळी वेलिंग्टन इथं पोहोचल्या. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांच्या उपस्थितीत त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वेलिंग्टन रेल्वे स्थानका समोरच्या उद्यानातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार ...

August 8, 2024 1:21 PM

views 22

पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून इस्रो यंदाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार

इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था यंदाचा स्वातंत्र्य दिवस पृथ्वी निरीक्षक उपग्रह प्रक्षेपित करून साजरा करणार आहे. १५ ऑगस्ट रोजी श्रीहरीकोटा इथून सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी इस्रोनं विकसित केलेला लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं  EoS 08 हा पृथ्वी निरीक्षक उपग्रह अवकाशात सोडला जाईल. त्यानंतर...

August 8, 2024 1:42 PM

views 22

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं वृद्धापकाळाने निधन

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज कोलकत्यात निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन आपल्यासाठी धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचं समाजमाध्यमावर केलेल्या पोस...

August 8, 2024 2:29 PM

views 34

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान मध्ये मुसळधार पावसाची शक्यता

  भारतीय हवामान विभागानं देशाच्या पूर्व, पश्चिम, मध्य, वायव्य आणि ईशान्य भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढल्या ५ दिवसांत देशाच्या दक्षिण भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कर्नाटकच्या किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.   हिमाचल प्रदेश, उ...

August 8, 2024 11:13 AM

views 47

राज्यसभेच्या १२ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबरला मतदान

देशातल्या 9 राज्यांतल्या 12 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. राज्यातल्या 2 जागांचा यात समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी या महिन्याच्या 14 तारखेला अधिसूचना जारी होईल. 22 तारखेला अर्जांची छाननी होईल. 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे. राज्यात खासदार उदय...

August 8, 2024 10:15 AM

views 23

इस्रोच्या चंद्रयान 3 संघाला दिला जाणार राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार

इस्रोच्या चंद्रयान 3 संघाला अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार दिला जाणार आहे. केंद्र सरकारनं 33 व्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. हे पुरस्कार विज्ञान, तंत्रज्ञान आणि नविनता क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात.   भारतीय विज्ञान...

August 7, 2024 8:27 PM

views 71

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विनेश फोगाट यांच्या कामगिरीचं कौतुक

विनेश फोगाटनं आत्तापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कौतुक केलं आहे. देशाला तिचा अभिमान असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं. तिला अपात्र ठरवल्यामुळे संपूर्ण देश निराश आहे, पण तरीही सर्व देशवासीयांसाठी ती चॅम्पियन असल्याचं मूर्मू यांनी नमू...