राष्ट्रीय

December 14, 2025 9:37 AM

views 70

दिल्लीच्या एम्समध्ये पक्षाघातावरील सुपरनोवा स्टेंटची चाचणी

नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पक्षाघातावरील 'सुपरनोव्हा स्टेंट' नावाच्या नवीन आणि प्रगत उपचार उपकरणाची भारताची पहिली चिकित्सालयीन चाचणी घेतली आहे. सुपरनोव्हा स्टेंट देशातील विविध प्रकारच्या रुग्णांसाठी तयार केला आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी वयाच्या रुग्णांनाही अनेकदा पक्षाघ...

December 13, 2025 9:03 PM

views 51

वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा रेल्वेमंत्र्यांच्या सूचना

वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ देण्यात यावे अशा सूचना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्या. IRCTC च्या वेबसाइटवर खाती उघडण्यासाठी कठोर पडताळणी सुरू केल्यापासून नव्या खात्यांची संख्या दैनंदिन १ लाखावरुन ५ हजारापर्यंत कमी झाल्याचं ते म्हणाले. ३ कोटींपेक्षा अधिक बनावट खाती बंद केली ...

December 13, 2025 9:01 PM

views 99

स्टेट बँकेची मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात

स्टेट बँकेनं मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यामुळं बँकेचा रेपो दराशी संलग्न व्याजदर ७ पूर्णांक ९ दशांश टक्के होईल. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील. यामुळं गृह, वाहन आणि इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसंच मुदत ठेवींवरचे व्याज दरही कमी होतील. इंडियन ओव्हरसीज बँकेनंही रेपो संलग्न व...

December 13, 2025 8:56 PM

views 69

कोलकात्यातल्या सॉल्ट लेक कार्यक्रमाच्या आयोजकाला अटक

दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर पुन्हा भारतभेटीवर आला आहे. गोट इंडिया टूर या खासगी दौऱ्याच्या निमित्तानं तो आज पहाटे कोलकात्यात दाखल झाला.  कोलकात्यातल्या सॉल्ट लेक मैदानावर  हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मेस्सीनं चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं. पण तो तिथे काह...

December 13, 2025 8:34 PM

views 255

केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएचा तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर विजय

केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत १०१ पैकी ५० जागा जिंकून विजय मिळवला आहे. त्यासोबतच इतर ठिकाणीही एनडीएनं चांगली कामगिरी केली आहे. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातल्या लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंटला गेल...

December 13, 2025 8:14 PM

views 50

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते – अमित शहा

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधे बस्तर ऑलिंपिक्सच्या समारोप सोहळ्यात आज ते बोलत होते. येत्या ३१ मार्चपर्यंत देशातू न नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार...

December 13, 2025 1:37 PM

views 72

पश्चिम बंगालमध्ये SIR दरम्यान २००२ च्या मतदार यादीत त्रुटी

पश्चिम बंगालमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेदरम्यान आई-वडील, नातेवाईकांच्या नावांच्या आधारे मतदारांची ओळख पटवताना २००२ च्या मतदार यादीत अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष सखोल पुनरिक्षणाचा पहिला टप्पा संपला असला तरी निवडणूक आयोग सातत्यानं याद्यांची पडताळणी करत आहे.    ८५ लाख १ हजा...

December 13, 2025 1:23 PM

views 70

कोळसा खाणींच्या लिलावासाठी ‘कोलसेतू’ धोरणाला मंजुरी

कोळसा खाणींच्या लिलावासाठी तयार केलेल्या  कोलसेतू धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं  मंजुरी दिली आहे. विविध प्रकारचे उद्योग आणि निर्यातीसाठी कोळसाचा वापर करताना पारदर्शक यंत्रणा असावी आणि उपलब्ध साधनसुविधांना पुरेपूर वापर व्हावा असा या धोरणाचा उद्देश असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नव...

December 13, 2025 1:10 PM

views 66

विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेस्सी भारत भेटीवर

विख्यात फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर खासगी दौऱ्याच्या निमित्तानं भारतभेटीवर आला आहे.  कोलकाता विमानतळावर  आज पहाटे चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोलकात्यात लेक टाऊन इथं त्याच्या सन्मानार्थ ७० फुटी पुतळा उभारला आहे. आपल्या तीन दिवसांच्या भारतभेटीदरम्यान मेस्सी  हैदराबाद, मुंब...

December 13, 2025 1:16 PM

views 57

संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली

संसदेवर  झालेल्या दहशतवादी हल्ल्याल्या आज  २४ वर्ष  पूर्ण होत असून  या हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं स्मरण म्हणून  देश आज त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. २००१ मध्ये झालेल्या या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सुरक्षा रक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली असून या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.