निवडणुका

December 26, 2025 5:26 PM

views 776

मनसेला धक्का! प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले प्रकाश महाजन यांनी आज ठाण्यातत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपण पद किंवा उमेदवारीसाठी कोणतीही मागणी न करता शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं महाजन यांनी बातमीदाराशी बोलताना सांगितलं. ते शिवसेनेचे प्रवक्ते असतील, असं शिंदे यां...

December 25, 2025 7:35 PM

views 127

Municipal Election: राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्यातल्या २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमधे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. उमेदवारांच्या मुलाखतींसाठी दोन्ही आघाड्यांची शिब...

December 25, 2025 7:35 PM

views 205

महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ...

December 24, 2025 3:10 PM

views 92

काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत…

मुंबई महापालिकेची निवडणुक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय झाल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केलं. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. पण कुठेही निम्म्या - निम्म्या जागा वाटपाची मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

December 23, 2025 8:54 PM

views 63

महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या तयारीत

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली.   येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा हो...

December 23, 2025 10:21 AM

views 122

महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला सुरूवात

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी रोजी प्रसिद्...

December 21, 2025 8:39 PM

views 2K

नगरपालिका नगराध्यक्षपदांच्या निवडणूक निकालात भाजपाला सर्वाधिक जागा

राज्यातल्या २८८ नगरपालिका, आणि २८५ नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांच्या निकालात महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली असून, भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलं, मात्र महाविकास आघाडीतल घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही.  तीन नगराध्यपदांसाठीच्या निव...

December 20, 2025 3:04 PM

views 130

मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व २२७ जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. मुंबई हे मोठं शहर असून देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक इथं राहतात. त्यांच...

December 20, 2025 2:57 PM

views 96

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांसाठी, तसंच विविध नगरपंचायतींमधल्या १४३ सदस्य-पदांसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी साडेसातला मतदान सुरुवात झाली असून साडेपाचपर्यंत ते सुरू राहणार आहे.   लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी दुपारी दीड वाजेपर्य...

December 20, 2025 1:27 PM

views 167

राज्यातल्या २४ नगरपरिषदां – नगरपंचायतींसाठी आज मतदान

राज्यातल्या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायती तसंच १५४ सदस्यपदांसाठी आज मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमुळे २ डिसेंबरला होणारं मतदान राज्य निवडणूक आयोगानं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.