निवडणुका

November 6, 2024 10:20 AM

views 46

मतदान जनजागृतीसाठी परभणीत निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर, मी मतदान करणार असे स्टिकर्स

मतदान जनजागृती करण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाच्यावतीनं, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर, मी मतदान करणार, असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तसंच कलापथकांच्या वाहनांवर आवाजाचे भोंगे लावून मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

November 6, 2024 10:17 AM

views 78

केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा घेणार आढावा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाच वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेतला जाईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ही माहिती दिली.

November 6, 2024 10:13 AM

views 66

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली.  ‘‘राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्र असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांग...

November 6, 2024 10:09 AM

views 63

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं लातूर ग्रामीण विधानसभेतले मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.  

November 6, 2024 9:33 AM

views 50

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात येत्या ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात येत्या आठ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत. आठ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिक, नऊ तारखेला अकोला आणि नांदेड, १२ तारखेला चंद्रपूर, चिमूर, सोलापूर आणि पुणे आणि १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत पंतप्रधानांच्या सभा हो...

November 6, 2024 9:28 AM

views 51

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. या सभेला...

November 6, 2024 9:17 AM

views 70

मतदार जागृतीसाठी राबविली जाणार विशेष मोहीम – एस.चोक्कलिंगम

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या जनजागृतीच्या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत केलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेख...

November 6, 2024 8:36 AM

views 87

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच...

November 5, 2024 8:12 PM

views 46

उद्धव ठाकरे यांची पक्षातल्या ५ नेत्यांवर निलंबनाची कारवाई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातील ५ नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्यानं निलंबनाची कारवाई केली. यात माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. काल पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार उमेदवा...

November 5, 2024 8:32 PM

views 108

महाविकास आघाडीला निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये आज घेतलेल्या प्रचार सभेत पाच आश्वासन मतदारांना देत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं.    महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतीमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. विद्यार्थींनीबरोबरच विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिलं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.