निवडणुका

November 10, 2024 1:49 PM

views 49

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. एनडीए आणि  इंडिया या दोन्ही आघाड्यांचे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यभर झंझावाती दौरे करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बोकारो इथं सभा घेत असून गढवा  इथंही...

November 9, 2024 7:00 PM

views 47

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं कमालीचा वेग घेतला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि इतर समाजमाध्यम व्यासपीठांवर आपापली भूमिका मांडून उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचे प्रचारक मतदारांपर्यंत पो...

November 9, 2024 11:37 AM

views 18

आसाममध्ये पाच जागांसाठी पोटनिवडणूक, 13 नोव्हेंबरला मतदान

आसाममध्ये 13 नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पाच विधानसभा जागांवर एकूण 34 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळं राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या प्रचार फेऱ्या, सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. प्रदेश क...

November 9, 2024 11:17 AM

views 41

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी झालं गृहमतदान

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल गृहमतदान पार पडलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया राबवली. धुळे शहरात 10 नोव्हेंबर रोजी गृह मतदान होणार असून, यासाठी चौदा पथकं नेमण्यात आली आहेत.

November 9, 2024 2:28 PM

views 53

मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ

विधानसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा,अभिमान महाराष्ट्राचा' या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. याअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतद...

November 9, 2024 6:59 PM

views 66

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार शिगेला

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान १३ नोव्हेंबरला होणार आहे, त्यामुळं तिथं प्रचार संपायला अवघे तीन दिवस उरले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज झारखंडच्या जमशेदपूरमधील छत्रपूर, हजारीबाग आणि पोटका विधानसभा मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल ग...

November 8, 2024 7:40 PM

views 72

राष्ट्रवादी काँग्रेसची बंडखोर पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पक्षाची आणि महायुती सरकारची प्रतिमा मलीन केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. बापू भेगडे, कृष्णा अंधारे, विश्वंभर पवार, पूजा व्यवहा...

November 8, 2024 7:14 PM

views 32

महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं – पंकजा मुंडे

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी खोटा प्रचार करत  मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं केला. महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोल...

November 8, 2024 7:10 PM

views 76

कोकणात बदल हवा असेल, तर मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा – राज ठाकरे

'कोकणात बदल हवा असेल, तर आतापर्यंत ज्यांना मतदान करत आला आहात त्यांना नाकारा आणि मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथल्या पाट-पन्हाळे इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मनसेचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

November 8, 2024 7:03 PM

views 44

शिवरायांचा पुतळा उभारताना महायुतीनं भ्रष्टाचार केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना महायुती सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा इथं केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करत होते. महाविकास आघाडीनं गेल्या काही काळात विकासकामं केली. प...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.