निवडणुका

November 11, 2024 7:23 PM

views 50

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची टीका

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वाशिम इथल्या प्रचारसभेत केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानाच्या रंगावरून वाद घालून लोकांना भ्रमित करू नये, असंही आंबेडकर म्हणाले.

November 11, 2024 7:14 PM

views 70

जीएसटीच्या माध्यमातून वसूल केलेले पैसे लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले – जयंत पाटील

महायुती सरकारच्या काळात जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून पैसे वसूल करून तेच लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले गेले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते आज पुणे जिल्ह्यातल्या पर्वती मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मह...

November 11, 2024 7:09 PM

views 55

शरद पवारांची भाजपावर टीका

लोकसभा निवडणुकीत भाजपानं ४०० हून अधिक जागा मिळवण्याचा निर्धार केला होता, तो पूर्ण झाला असता तर संविधान बदलण्याचा धोका निर्माण होऊ शकला असता, मात्र जनतेच्या जागरूकतेमुळे हे घडलं नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते जळगाव इथं प्रचारसभेत बोलत होते. भारतीय घटनेच्या संरक्षणासाठी सावधान रा...

November 11, 2024 7:02 PM

views 43

मविआचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीचा निवडणूक जाहिरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली, मात्र आता ते याच योजने अंतर्गत महिलांना तीन हजार रुपये...

November 11, 2024 7:44 PM

views 62

राहुल गांधी अपप्रचार करत असल्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अपप्रचार करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. गांधी यांनी भाजपावर राज्यघटना नष्ट करत असल्याचा खोटा आरोप करत तणाव निर्माण केल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं असून आयोगाने यावर कायदेशीर...

November 11, 2024 6:47 PM

views 79

विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते.    काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्हाला उठ...

November 11, 2024 7:45 PM

views 56

जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा महायुतीला सत्तेतून तडीपार करण्याची पटोलेंची मागणी

भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानं ते हिंदू-मुस्लीम मुद्दा उपस्थित करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होत...

November 11, 2024 3:38 PM

views 49

राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट – अनिल सोले

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट असं भाजपा नेेते अनिल सोले यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी सोले यांनी दिली. संकल्पपत्र बनवण्यासाठी...

November 11, 2024 3:26 PM

views 44

भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे – उद्धव ठाकरे

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, मात्र भाजपाचे नेते ३७० कलमसारखे मुद्दे मांडून लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज वणी मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत बोलत होते. मुंबईसह राज्यभरातले विविध प्रकल्प विशिष्ट उद्योगसमूहाला आंदण दिले जात असून...

November 11, 2024 3:17 PM

views 85

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती चित्ररथाचं आयोजन

स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या चित्ररथाला आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.   नंदुरबारम...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.