निवडणुका

December 23, 2024 1:17 PM

views 45

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी

दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आज दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी केले. सत्ताधारी आप सरकारनं नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाहीत असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते  अनुराग ठाकूर, दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा आणि अन्य काही नेत्यांनी यासंदर्भातील पुरावे सादर केले आहेत....

December 18, 2024 1:35 PM

views 41

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची बैठक

पुढच्या वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठीची निवडणूक आयोगाची बैठक सध्या सुरू आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी, तसंच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या बैठकीत चर्चा सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही आयोग आज संवाद साधणार आहे. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा क...

December 13, 2024 10:58 AM

views 41

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 21 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली आहे. पक्षाने बादली विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून संदीप दीक्षित, बल्लीमारन मतदारसंघातून हारून युसूफ, वजीरपूरमधून रागिणी नायक, सीलमपूरमधून अब्दुल रहमान आणि...

December 4, 2024 7:31 PM

views 40

महायुतीचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा

महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस, अजित पवार, आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. याव...

December 3, 2024 9:31 AM

views 61

ईव्हीएमबाबत खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. तसंच मतदानाच्या दिवशी संध्याकाळी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारी...

December 3, 2024 3:37 PM

views 52

भाजपाकडून विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक

राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा सुरू आहेत. राज्यात भाजप विधिमंडळ गटनेता निवडीसाठी पक्षानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंड...

December 2, 2024 6:46 PM

views 59

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातल्या मतदानात तफावत

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातलं मतदान यात तफावत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत  बोलत होते.    यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी उदाहर...

December 1, 2024 7:15 PM

views 49

राज्यात येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार

महायुतीमध्ये कसलाही वाद नाही असं सांगत महाराष्ट्रात  येत्या गुरुवारी 5 डिसेंबर ला शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री बनतील असं त्यांनी काल स्पष्ट ...

December 1, 2024 7:05 PM

views 64

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली फेरमतदानाची मागणी फेटाळली

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवली गेली असं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची फेरमतदानाची मागणी फेटाळली आहे. मारकडवाडीतल्या ग्रामपंचायतीने मतदान प्रक्रियेची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा फेरमतदानाच्या मागणीचा ठराव निवडणूक निर्...

December 1, 2024 5:03 PM

views 71

ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तिविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.