निवडणुका

March 18, 2025 7:02 PM

views 97

विधानपरिषद पोटनिवडणुकीत पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे.

March 17, 2025 3:54 PM

views 92

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस

राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनीही अर्ज भरला. तर अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे. &nbsp...

March 16, 2025 8:13 PM

views 99

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे. &nbs...

March 11, 2025 8:37 PM

views 107

केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांकडून मागवल्या सूचना

देशातली निवडणूक प्रक्रीया मजबूत करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत. मतदार याद्यांमधे घोळ असल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. निवडणूक प्रक्रीयेत काही अडचणी असल्यास येत्या ३० एप्रिलपर्यं...

March 4, 2025 8:01 PM

views 43

सर्व अधिकाऱ्यांनी आपलं काम पारदर्शकरित्या आणि चोखपणे पार पाडावं-मुख्य निवडणूक आयुक्त

सर्व राज्यांचे निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि केंद्र स्तरावरल्या अधिकाऱ्यांनी आपलं काम पारदर्शकरित्या आणि चोखपणे पार पाडावं असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलं. सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेला ते संबोधित करत ...

March 4, 2025 10:10 AM

views 54

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होते आहे. विधानसभा आमदारांच्या मधून ही निवडणूक होणार आहे.   या निवडणुकी...

February 27, 2025 9:46 AM

views 45

दिल्ली विधानसभेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक

दिल्ली विधानसभेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता भाजप आमदार मोहन सिंग बिष्ट यांचं नाव उपसभापती पदासाठी सुचविणारा प्रस्ताव मांडतील. बिष्ट हे मुस्तफाबाद मतदारसंघाचे आमदार आहेत.

February 26, 2025 1:16 PM

views 47

लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपचे खासदार संजय अरोरा यांना उमेदवारी

पंजाबमधल्या लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने राज्यसभेचे खासदार संजय अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. अरोरा हे २०२२ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. लुधियाना पश्चिमचे आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचं गेल्या महिन्यात निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.  

February 23, 2025 8:05 PM

views 38

जर्मनीत संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु

जर्मनीत, गुंडेस्टॅग अर्थात संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. सोशल डेमोक्रॅ्टिक पार्टीचं आघाडी सरकार कोसळ्ल्यामुळे नवं सरकार आणण्यासाठी सुमारे ५ कोटी ९० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २९९ मतदारसंघांमधे ४ हजार ५०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ख्रिश्चन डेमोक्रॅ्टिक यु...

February 19, 2025 9:31 AM

views 35

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश, प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

गुजरातमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपानं निर्विवाद यश मिळवलं आहे. भाजपानं 68 पैकी 60 नगरपालिकांवर विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या असून कॉँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. जुनागड महानगरपालिकेत भाजपानं 60 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. भाजपानं 16 तारखेला मत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.