डीडी बातम्या

December 8, 2024 11:19 AM

views 33

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार – अमित देशमुख

लातूर महानगरपालिकेची महिलांसाठी मोफत शहर बस सेवा पुढे चालूच राहणार असल्याचं, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. महापालिका प्रशासनाने महिलांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावीत, अशा सूचना देशमुख यांनी आहे.

December 7, 2024 7:46 PM

views 42

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला दहावा सामना अनिर्णित

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला दहावा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही खेळाडू प्रत्येकी पाच गुणांसह बरोबरीत आहेत. या स्पर्धेत लिरेननं पहिला तर गुकेशनं तिसरा गेम जिंकला. इतर सर्व गेममधे बरोबरी झाली आहे. अजून ४ सामने बाकी आहेत.

December 7, 2024 5:16 PM

views 38

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल-नितीन गडकरी

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये राष्ट्रीय अग्निशमन  महाविद्यालयात 'इलेक्ट्रिक वाहनातल्या आगीच्या दुर्घटनांचं व्यवस्थापन'  या विषयावरच्या कार्यशा...

December 1, 2024 7:12 PM

views 34

अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा उद्योगपती गौतम अदानी यांचा दावा

अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा उद्योगपती गौतम अदानी यांनी केला आहे. जयपूर इथं आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या कंपनीने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन केलेलं नसून अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही, असं अदानी यावेळी म्हणाले....

December 1, 2024 7:13 PM

views 53

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन आज साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे पितामह असून त्यांच्या विचारातूूनच लोकशाहीचा पाया घातला गेला असं कानडे यावेळी म्हणाले. उत्तमराव पाटील हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. यावेळी दिशा...

November 26, 2024 7:42 PM

views 62

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक – प्रधानमंत्री

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर...

November 25, 2024 7:18 PM

views 42

प्रसारभारती, रेलटेल, प्लेबॉक्सटीव्ही एकत्रितपणे रेलवायर ब्रॉडबॅन्ड ही स्वतंत्र योजना तयार

प्रसारभारती, रेलटेल आणि प्लेबॉक्सटीव्ही यांनी एकत्रितपणे रेलवायर ब्रॉडबॅन्ड ही स्वतंत्र योजना तयार केली आहे. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव दि्ववेदी आणि रेलटेलचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार यांनी या योजनेचं आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं. रेलवायर या रेलटेल कंपनीच्या किरकोळ इ...

November 20, 2024 6:46 PM

views 55

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान झालं तरी मर्यादित ठिकाणी गैरवापर झाले. त निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई केली.  नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातले शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना आज सकाळी जीवे मा...

November 19, 2024 7:47 PM

views 89

पैसे वाटप प्रकरणी भाजपा नेते विनोद तावडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय व्यक्तीला तिथे थांबता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तावडे पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ ...

November 16, 2024 5:41 PM

views 54

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा भाजपाचे नेते किरण रिजिजू यांचा आरोप

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी केला. ते आज नागपूरात भाजपा कार्यालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या काँग्रेसनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला इतका विलंब...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.