May 11, 2025 3:44 PM | Fact Check

printer

खोट्या पोस्टना बळी न पडण्याचं आवाहन

भारत-पाकिस्तान संघर्षाचं खरं फुटेज म्हणून अनेक लढाऊ गेमिंग व्हिडिओ हे चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असून नागरिकांनी अशा खोट्या पोस्टना बळी पडू नये, असं आवाहन ‘पीआयबी’ अर्थात, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या सत्यता पडताळणी विभागानं केलं आहे. तसंच नागरिकांना अशा अपप्रचारापासून सावध राहायचं आवाहन केलं आहे.

 

भारत-पाकिस्तान यांच्यातली सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरी तयारीसाठी सूचना देत असल्याचा बनावट संदेशही संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाच्या नावानं व्हॉट्सॲपवर फिरत असून केंद्र सरकारनं असे कोणतेही निर्देश दिलेले नसल्याचं या विभागानं स्पष्ट केलं आहे.

 

समाज माध्यमांवर पाकिस्तान अपप्रचार करत असल्यानं, प्रत्येक माहितीची काळजीपूर्वक तपासणी करायचं, तसंच कोणतीही संशयास्पद सामग्री आढळली अथवा भारतीय सशस्त्र दलांबद्दल किंवा चालू घडामोडींबाबत कोणतीही संशयास्पद माहिती आढळली तर याबाबतची माहिती नागरिकांनी पीआयबी सत्यता पडताळणी विभागाकडे ८७९९७११२५९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि factcheck@pib.gov.in या ईमेल पत्त्यावर पाठवावी, असं आवाहनही या विभागानं केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.