January 24, 2026 7:17 PM

views 102

प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगीत तालीम संपन्न

७७ व्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची रंगीत तालीम काल कर्तव्य पथावर झाली. भारताचा समृद्ध वारसा, लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक वैविध्य यांचं प्रतिबिंब या कार्यक्रमात प्रकर्षानं दिसून आलं. संरक्षण दलाच्या विविध कवायत तुकड्या तसंच राज्यं,...

January 24, 2026 3:54 PM

views 144

मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर २ कोटी ८९ लाख रूपये किमतीचं सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचलनालयानं आज मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर सौदी अरेबियातून अवैधरित्या आणलेलं सुमारे २ कोटी ८९ लाख रूपये किमतीचं सोनं जप्त केलं. दीड किलोहून अधिक वजनाचं हे सोनं एका यंत्रात लपवलेलं होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हे पार्सल ...

January 24, 2026 3:50 PM

views 140

गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी १० आरोपींना जन्मठेप

गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने दिली आहे.यातले २ जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून इतर ८ आरोपींना अटक करण्याती प्रक्रीया सुरु असल्याचं पोलीसांनी सांगितलं. २०१९ मधे अकोला शहरातल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात हुंडीवाले यांची हत्या झाली ह...

January 24, 2026 3:26 PM

views 92

बूथ स्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश

भारतीय निवडणूक आयोगानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बूथ स्तरीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा, गैरवर्तन, आपल्या सूचनांचं जाणूनबुजून पालन न करणं किंवा लोकप्रत...

January 24, 2026 3:24 PM

views 117

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात दुहेरी सामाजिक सुरक्षा आकारणी रद्द करण्यासाठीच्या करारासंदर्भात चर्चा

भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात दुहेरी सामाजिक सुरक्षा आकारणी रद्द करण्यासाठीच्या करारासंदर्भात आज नवी दिल्ली इथं चर्चा झाली. २१ आणि २२ जानेवारी रोजी झालेल्या या चर्चेला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव पी. एस. गंगाधर आणि यूकेच्या राष्ट्रीय विमा धोरण विभागाचे उपसंचालक एडमंड हेअर उपस्थित ...

January 24, 2026 3:16 PM

views 163

राष्ट्रीय बालिका दिवस आज देशभरात साजरा

राष्ट्रीय बालिका दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. मुलींचे अधिकार, आरोग्य, पोषण आणि कल्याण अबाधित राखत लैंगिक समानता, समान अधिकार तसंच मुलींची सक्षम नागरिक म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं दरवर्षी २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्ह...

January 24, 2026 8:12 PM

views 129

रणजी करंडकात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात, सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ड गटात इथं सुरु असलेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी, सर्फराज खानच्या द्विशतकी खेळीच्या बळावर मुंबईनं आपली बाजू भक्कम केली. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढचा खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा ...

January 24, 2026 2:56 PM

views 89

भारताच्या परदेशी चलन साठ्यात १४ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त वाढ

१६ जानेवारीला रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परदेशी चलन साठ्यात १४ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त वाढ होऊन एकूण चलन साठा ७०१ अब्ज डॉलर्स झाला. परदेशी चलन साठ्याचा मुख घटक असलेली परदेशी चलन मालमत्ता जवळपास १० अब्ज डॉलर्सनी वधारून ५६० अब्ज डॉलर्सच्या वर गेली. युरो, पाऊंड आणि येन या चलनांच्या मूल्यातल्या ...

January 24, 2026 2:50 PM

views 80

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी वर्षानिमित्त आज आणि उद्या महाराष्ट्रात नांदेड इथं शहीदी सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत. या अनुषंगाने आज ...

January 24, 2026 2:43 PM

views 81

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधे हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी बर्फ साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे तसंच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पर्यटकांची वाहनं अडकून पडली आहेत तसंच वीजपुरवठाही खंडित झाला आहे. राजधानी शिमला इथं उंचावरच्या भागात काल रात्री पुन्हा जोरदार ह...