October 25, 2025 8:28 PM

views 33

भारत देश येत्या दोन वर्षात मोबाईल फोनच्या सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल-वैष्णव

भारत देश येत्या दोन वर्षात मोबाईल फोनच्या  सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत  होते.    सर्व्हरसह उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणकांसा...

October 25, 2025 8:20 PM

views 59

मुंबईचा AQI हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला

मुंबईचा AQI अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला आहे. दिवाळीत हा निर्देशांक झपाट्याने खालावला होता. दोन दिवस काही ठिकाणी पडलेल्या तुरळक पावसाने धुरके खाली बसून निर्देशांकात सुधार व्हायला मदत झाली.  बहुतांशी ठिकाणी हा निर्देशांक मध्यम श्रेणीत पोचला.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपा...

October 25, 2025 8:10 PM

views 182

ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं आज दुपारी अडीच वाजता मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते.  त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने आज दुपारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.    १९७२ मधे पुण्याच्या  चित्रपट...

October 25, 2025 8:09 PM

views 380

AI चा वापर करणारा सिंधुदुर्ग देशातला पहिला जिल्हा

प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी  नीती आयोगाचं एक पथक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निती आयोगाचं पथक या दौऱ्यात...

October 25, 2025 8:06 PM

views 39

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची  विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची-मुख्यमंत्री

सर्वज्ञ चक्रधर स्वामींची  विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची असून सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच त्यांनी समाजात समतेचा विचार रुजवला, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नाशिक इथं आज  अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या  अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत...

October 25, 2025 6:38 PM

views 72

लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन

लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. राजस्थानात जैसलमीर इथं लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत सुरु केलेल्या उपक्रमांमधे लष्करासाठी डिजिटल डेटा संकलनाचा समावेश आहे.  लष्करी  जवानांना देशभरात रेल्वेने प्रवास करण्यासाठी उपयुक्त...

October 25, 2025 6:28 PM

views 104

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलं जाहीर

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. युक्रेननं रोस्तोव्ह, वोल्गोग्राड, ब्रायन्स्क, कलुगा, स्मोलेन्स्क, बेल्गोरोड, मॉस्को, वोरोनेझ, लेनिनग्राड, नोव्हगोरोड, रियाझान, तांबोव, टव्हर आणि तुला या भागांमध्ये हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठ...

October 25, 2025 3:20 PM

views 125

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि राज्यात महायुती ही विचारांची युती असून महायुतीत कोणताही बेबनाव नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ...

October 25, 2025 3:09 PM

views 64

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियान परिषदेसाठी आशिया दौऱ्यावर

मलेशिया इथं होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रवाना झाले आहेत. हा त्यांचा राजकीय दौरा असून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग  आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष  किम जोंग उन यांच्यासह ते अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प व्यापार य...

October 25, 2025 3:05 PM

views 33

जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं-MEA India

पाकिस्ताननं भारताच्या भूभागात, विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केलं आहे.  ते काल ८० व्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त  आयोजित खुल्या चर्चे दरम्यान, संयुक्त राष्ट...