November 1, 2025 3:35 PM

views 74

देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत घट

देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत आजपासून घट झाली आहे. घरगुती वापराच्या १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या एल पी जी सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.   व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत साडे चार ते साडे सहा रुपयांपर्यंत घट झाली असून यानुसार आता दि...

November 1, 2025 12:34 PM

views 59

केरळ राज्याचा स्थापना दिवस

केरळ राज्याचा आज स्थापना दिवस आहे. 1956 मध्ये याच दिवशी त्रावणकोर, कोचीन आणि मालाबारच्या विलिनीकरणानंतर केरळ राज्याची निर्मिती झाली होती.   या निमित्तानं केरळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्य विधानसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे.

November 1, 2025 12:32 PM

views 41

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच, -नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल वात्सायन

ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नसून भारतीय नौदल प्रभावीपणे तैनात असल्याचं नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल वात्सायन यांनी म्हटलं आहे. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक चिनी जहाजावर आपण लक्ष ठेवून आहोत असं त्यानी सांगितलं. फेब्रुवारी 2026 मध्ये विशाखापट्टणम इथे होणाऱ्या आगामी आ...

November 1, 2025 12:28 PM

views 113

दहशतवाद आणि छुपे युद्ध, तसंच चुकीची माहिती पसरवणं ही आजच्या काळातील मोठं आव्हान- लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

पारंपारिक स्पर्धा, दहशतवाद आणि छुपे युद्ध, तसंच चुकीची माहिती पसरवणं ही आजच्या काळातील मोठं आव्हान असल्याचं लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेकरता युवकांना सक्षम करण्यासाठी आयोजित 'यंग लीडर्स फोरमला' संबोधित ते बोलत होते.   आव्हानांच्या या युगात, र...

November 1, 2025 12:05 PM

views 65

भारत-इंग्लंड संबंध आता गतिमान आणि भागीदारीमध्ये विकसित झाले – परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर

भारत-इंग्लंड संबंध एका गुंतागुंतीच्या ऐतिहासिक संबंधापासून गतिमान आणि भविष्यकालीन भागीदारीमध्ये विकसित झाले असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीमध्ये यूके राष्ट्रीय दिन समारंभात ते बोलत होते.   दोन्ही देश कनेक्टिव्हिटी, एआय आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या बाबतीतही...

November 1, 2025 10:48 AM

views 39

सागरी सुरक्षा ही भारत-आसियान सहभागाचा केंद्रबिंदू-संरक्षण मंत्री

आसियान संघटना आणि भारतानं वेगवान आर्थिक विकास केला असून सागरी सुरक्षा ही भारत-आसियान सहभागाचा केंद्रबिंदू असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. सागरी मार्ग सुरक्षित करणे हे देशाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगत भारताचा अर्ध्याहून अधिक व्यापार हा दक्षिण चीन समुद्र आणि मलाक्का सामुद...

November 1, 2025 10:40 AM

views 36

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या मोहिमेअंतर्गत भारताचे तीन गिनीज विश्व विक्रम

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' या मोहिमेअंतर्गत भारताने तीन गिनीज विश्व विक्रम केले आहेत. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या मोहिमेत लोकांचा अभूतपूर्व असा सहभाग दिसून आला.   या उपक्रमाने अनेक विक्रम प्रस्थापित केलेअसून एकाच महिन्यात सर्वाधिक 3 कोटी 21 लाख लोकांची आरोग्य सेवा नोंदण...

November 1, 2025 10:36 AM

views 37

बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुड्डाची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक

जर्मनीमध्ये सुरू असलेल्या हायलो ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुड्डा ने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उन्नतीने उप-उपांत्य फेरीत चौथ्यामानांकित चायनीज तैपेईच्या लिन हसियांग-ती हिचा 22-20, 21-13 असापराभव केला.   आता अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी तिचा सामना अव्वल मान...

November 1, 2025 10:29 AM

views 241

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. दोन्ही परीक्षा 18 मार्च रोजी संपतील.   प्रात्यक्षिक परी...

November 1, 2025 10:13 AM

views 37

व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांना जास्त अधिकार देण्यावर विचार

राज्यात सध्या 154 सुधारणांचा समावेश असलेली जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी चिंतन शिबिरं तसंच विभागीय बैठकाचं आयोजन करण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना जास्त अधिकार प्रदान करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. व्यव...