June 18, 2024 7:27 PM

views 46

देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध – मंत्री रक्षा खडसे

शेतकरी हा देशाचा कणा आहे, देशातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि भविष्यातही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असेल, असं प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज हिंगोली इथं केलं. हिंगोली जिल्ह्यात  तोंडापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमं...

June 18, 2024 7:12 PM

views 58

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीनं शेतीचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याला आपण प्राधान्य दिल पाहिजे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मधल्या मेहेंदीगंज इथं  केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता आज शेतकऱ्यांच...

June 18, 2024 7:07 PM

views 66

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं आज केली. विधानसभेच्या आमदारांकडून या सदस्यांची निवड होणार आहे.  या निवडणुकीची अधिसूचना २५ जून रोजी जारी होणार असून २ जुलैपर्यंत अर्ज भरता येतील. ३ जुलैला अर्जांची छाननी होईल आणि ५ जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येत...

June 18, 2024 6:46 PM

views 46

खेळांना महत्व प्राप्त व्हावं यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीनं राष्ट्रीय क्रीडा संहितेचं काटेकोर पालन करत राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी, तसंच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार...

June 18, 2024 6:48 PM

views 53

राज्य पोलीस दलातल्या १७ हजारांहून अधिक पदांसाठी उद्यापासून मैदानी चाचणी

राज्य पोलीस दलातल्या १७ हजारांहून अधिक पदांसाठी उद्यापासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. यात पोलीस शिपाई, चालक, बँडवादक, तुरुंग विभाग शिपाई अशा पदांचा समावेश आहे. यात उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. या परिस्थितीत मैदानी चाचणी एकाच दिवशी असेल तर उमेदवारांना ४ दिवसांच्या अंत...

June 18, 2024 5:39 PM

views 85

खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यास सुरुवात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आज झाली. शेतकऱ्यांना यावर्षी देखील पीक विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया द्यावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. विमा काढण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून  शेतकऱ्यांनी त्यापूर्वी  पीक विमा भरून घ...

June 18, 2024 7:41 PM

views 63

नीट २०२४ परीक्षेतल्या अनियमिततेच्या तक्रारीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नीट २०२४ परीक्षेतल्या अनियमिततेच्या तक्रारीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परीक्षेतल्या त्रुटींचं निवारण करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.  न्यायालयानं विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारला नोटीस बजाव...

June 18, 2024 3:54 PM

views 75

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रास्तवित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मार्गासाठी संपादित करण्यात आलेली बहुतांश जमीन बागायती असून या महामार्गामुळे परिसरातल्या पर्यावरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास होईल या कारणामुळे कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातले शेतकर...

June 18, 2024 3:17 PM

views 71

पाकिस्तानचा शास्त्रज्ञ निशांत अग्रवालच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांची घुसखोरी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांनी ३ ॲपद्वारे घुसखोरी करून माहिती चोरी केल्याचं तपासात उघडकीला आलं आहे, असं उत्तर प्रदेशाचे दहशहतवाद विरोधी पथकाचे अधिकारी पंकज अवस्थी यांनी या खटल्यादरम्यान दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. ब्रह्मोस एरोस्पेस...

June 18, 2024 3:14 PM

views 62

व्लादिमीर पुतिन या आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या आठवड्यात उत्तर कोरियाला भेट देणार आहेत. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातली द्विपक्षीय भागीदारी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असताना पुतिन यांच्या भेटीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे. उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील सखो...