June 28, 2024 2:46 PM

views 50

सार्क देशांमधल्या चलन अदलाबदल सुविधेसाठी नवीन सुधारित चौकट लागू – भारतीय रिझर्व्ह बँक

सार्क देशांमधल्या चलन अदलाबदल सुविधेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं नवीन सुधारित चौकट लागू केली आहे. या सुधारणेनुसार, २०२४ ते २०२७ या काळात ज्या सार्क देशांच्या मध्यवर्ती बँका चलन अदलाबदल सुविधेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांच्याबरोबर द्विपक्षीय करार केले जातील. या सुविधेसाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा मदत...

June 28, 2024 3:20 PM

views 92

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ : विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर

अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा. २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार. दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी राखीव. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार. १७ शहरात १० हजार महिलांना पिंक  रिक्षा खरे...

June 28, 2024 1:42 PM

views 71

वैद्यकीय प्रवेश परीक्षा – नीट मधल्या गैरप्रकारांविषयी लोकसभेत विरोधी पक्षसदस्यांचा गदारोळ

वैद्यकीय प्रवेश परीक्षा - नीट मधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्षसदस्यांनी गदारोळ केल्यामुळे, आज लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती. मात्र लोकसभे...

June 28, 2024 1:39 PM

views 57

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत देण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन

अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत देऊ, असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन आज दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झालं. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांंनी विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. अवकाळी पाव...

June 28, 2024 1:34 PM

views 58

अमरनाथ यात्रेला जम्मूहून प्रारंभ

सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आजपासून आरंभ झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूहून रवाना केलं. पहलगामहून उद्या यात्रा सुरु होईल. प्रशासनानं यात्रेकरूंसाठी ऑनलाईन नोंदणीसोबतच ऑफलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध ...

June 28, 2024 12:35 PM

views 47

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामीन मंजूर

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज झारखंड उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. मनीलाँडरिंग प्रकरणी सुमारे साडेआठ एकर जमीनीचा ताबा अवैधपणे घेतल्याचा आरोप सोरेन यांच्यावर आहे. सक्तवसुली संचालनालयाने गेल्या ३१ जानेवारीला सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती.

June 28, 2024 12:01 PM

views 84

टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या अंतिम सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत

टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, उद्या गायना मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामना होणार आहे. काल भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या आणि कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला माघारी पाठवत भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.   पावसामुळं नाणेफेकील...

June 28, 2024 11:54 AM

views 46

नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल सुरू

नैऋत्य मोसमी पावसाने उत्तरेकडे वाटचाल सुरू केली आहे. संपूर्ण अरबी समुद्र, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट बाल्टिस्तानचा बहुतांश भाग, पंजाब, पूर्व उत्तरप्रदेशच्या काही भागात मान्सूनची आगेकूच झाली आहे. येत्या दोन तीन दिवसांत देशाच...

June 28, 2024 11:41 AM

views 38

नांदेड-पुणे, नांदेड -नागपूर विमानसेवेला कालपासून सुरुवात

गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या नांदेड-पुणे, नांदेड - नागपूर विमानसेवेला कालपासून सुरुवात झाली. सकाळी साडेदहाला नांदेडवरून निघणारे विमान पुण्यात सकाळी साडेअकरा वाजता पोचेल. तर नागपुरसाठी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी विमान सुटून ते दुपारी दोन वाजता नागपूरला पोहोचेल. नागपूरवरून सकाळी सव्वा...

June 28, 2024 11:25 AM

views 64

 सुनिता विल्यम्स यांचं पुनरागमन पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर

 सुनिता विल्यम्स यांचं पुनरागमन पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचं पृथ्वीवरील नियोजित पुनरागमन पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडलं आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोचवणाऱ्या बोईंग स्टारलाईन अंतराळयानाला पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींना सामोर...