August 25, 2024 8:15 PM

views 73

इस्रायलवर हिजबुल्लाह संघटनेकडून क्षेपणास्त्रांचा हल्ला

हिजबुल्लाह या लेबनॉनमधल्या दहशतवादी संघटनेनं आज सकाळी इस्रायलवर हल्ला सुरू केला. त्यांचा लष्करी नेता फौद शुकुर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला असल्याचं हिजबुल्लाहनं म्हटलं आहे. ३० जुलै रोजी बैरुत इथं शुकुर याची हत्या झाली होती. हिजबुल्लाहनं इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे....

August 25, 2024 8:06 PM

views 69

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर येत्या फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परततील

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर येत्या फेब्रुवारी महिन्यात, पृथ्वीवर परततील. हे दोघं मुळात ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. मात्र त्यांच्या अंतराळयानात उद्भवलेल्या अनपेक्षित समस्येमुळे त्यांना जवळजवळ ८ महिने अंतराळात घालवावे लागत आहेत. त्यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थ...

August 25, 2024 7:59 PM

views 38

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्याकडून एकात्मिक निवृत्तीवेतन योजनचं कौतुक

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकात्मिक निवृत्तीवेतन योजना सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी स्वागत केलं आहे. ते बिहारमध्ये पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते.  केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचं योगदान १४ टक्क्यावरून साडे अठरा टक्क्यापर्यंत वाढवायच...

August 25, 2024 7:47 PM

views 74

पाकिस्तान : दोन वेगवेगळ्या अपघातांमधे ३७ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

पाकिस्तानात आज दोन वेगवेगळ्या अपघातांमधे ३७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. पाकव्याप्त काश्मिरमधे एक बस खड्यात कोसळून २६ जणांचा मृत्यू झाला, तर तीनजण जखमी झाले.    तर, बलुचिस्तान प्रांतात माक्रन किनारी महामार्गावर,  इराणहून पंजाब प्रांतात परतत असलेल्या शिया यात्रेकरुंच्या बसला झालेल्या...

August 25, 2024 7:42 PM

views 66

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून बचावकार्य

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. पूरामुळे जास्त प्रभावित झालेल्या दक्षिण त्रिपुरा आणि सेपाहिजाला जिल्ह्यांमध्ये अजूनही बचावकार्य सुरु आहे. भूप्रदेशाची माहिती नसल्यामुळे, अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान एनडीआरएफ समोर आहे. गोमती आणि रुद्रसागर तलावाच्या पाण्याच...

August 25, 2024 7:39 PM

views 57

श्रीकृष्ण जयंतीच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना तसंच परदेशस्थ भारतीयांना श्रीकृष्ण जयंती अर्थात कृष्णाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या दैवी आदर्शांची आठवण करुन देणारा हा सण सर्वांना कायम प्रेरणा देत राहील असं मुर्मू यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती  जगदीप धनखड यांनी ...

August 25, 2024 7:07 PM

views 31

पुढचे दोन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस

पुढचे दोन दिवस कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याच...

August 25, 2024 6:22 PM

views 67

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी विमानसेवा सुरू

पुण्यातून कोकणात जाण्यासाठी ३१ ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू होत आहे. पुणे ते गोवा आणि पुणे ते सिंधुदुर्ग या दोन्ही मार्गांवर थेट विमानसेवा सुरू होत आहे. एका खासगी विमान कंपनीकडून शनिवार आणि रविवारी ही विमानसेवा सुरू असेल. 

August 25, 2024 7:08 PM

views 35

नांदेड रेल्वे स्थानक आगामी काळात देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक होईल – राज्यमंत्री रवनीत सिंग

नांदेडचं रेल्वे स्थानक हे येत्या कालावधीत सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेलं देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक करण्यात येईल, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी म्हटलं आहे. गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा सुरु करण्य...

August 25, 2024 3:47 PM

views 32

नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसला झालेल्या अपघातात २ ठार, २४ जखमी

नागपूर - अमरावती महामार्गावर नांदगावपेठ जवळ राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या शिवशाही बसला झालेल्या अपघातात दोन प्रवासी ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरहून अकोल्याला जाणाऱ्या बससमोर अचानक आडव्या आलेल्या गायीला वाचवताना नियंत्रण सुटल्यानं ही बस उलटून हा अपघात ...