August 26, 2024 8:40 PM

views 41

जम्मू-कश्मिर विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाची सोळा उमेदवारांची यादी जाहीर

जम्मू काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने आज सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली. ९० जागांसाठी होणाऱ्या या  निवडणुकीकरता भाजपानं याआधी ४४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती मात्र ती नंतर मागं घेतली. या निवडणुका येत्या १८ सप्टेंबरपासून तीन टप्प्यात होणार आहेत. मतमोजणी ४ ऑक्टोबरला होईल.   

August 27, 2024 10:39 AM

views 28

छत्तीसगढमधे एकूण २९ लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या २५ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात २५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या माओवाद्यांपैकी तिघांवर प्रत्येकी आठ लाखाचं, एकावर ३ लाखांचं तर दोन माओवाद्यांवर प्रत्येकी १ लाखांचं पारितोषिक असं एकूण २९ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जिल्हा पोलिस अधिक्षक आणि पोलिस महासंचालक यांच्य...

August 26, 2024 8:18 PM

views 21

मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती

मुसळधार पावसामुळे आज गुजरातच्या अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथल्या आप्तकालीन साहाय्य केंद्रात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याला प्राधान्य द्यावं अशा सूचना मुख्यमंत्...

August 26, 2024 8:14 PM

views 91

२७व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद २०२४ चं आयोजन

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासह प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग तसंच, राज्य शासनाचा प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २७व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४चं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य...

August 26, 2024 8:09 PM

views 64

आशियाई सर्फिंग सांघिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक

मालदीवच्या थुलुसधू इथं झालेल्या आशियाई सर्फिंग २०२४ स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून जपान ५८ पूर्णांक ४० गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर भारत २४ पूर्णांक १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  तैपेई २३ पूर्णांक ९३ गुणांसह तिसऱ्या, तर  चीन २२ पूर्णांक १०  गु...

August 26, 2024 8:06 PM

views 41

मुंबई – गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई - गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी आज सार्वजनुक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही कंत्राटदारांमुळे महामार...

August 26, 2024 7:55 PM

views 41

येत्या दोन दिवसात, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता

येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात, कोकणात किनारपट्टीवर वारे वाहण्याची तसंच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

August 26, 2024 7:27 PM

views 45

आदिवासी बांधवांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत – राज्यपाल

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी  केलं आहे. आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनवणं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं, या विषयाबाबत आज मुंबईत राजभवनात ...

August 26, 2024 9:12 PM

views 67

दुसऱ्या भारत-सिंगापूर गोलमेज परिषदेत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा

दुसरी भारत-सिंगापूर गोलमेज परिषद आज सिंगापूर इथं झाली. भविष्यात दोन्ही देशात सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही देशांंच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. डिजिटायझेशन, कौशल्य विकास, शाश्वत विकास, आरोग्य आणि औषधी या क्षेत्रांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मं...

August 27, 2024 8:42 AM

views 74

मालवण-राजकोट इथला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त झाले असून त्यांनी शांतता आ...