August 27, 2024 6:59 PM

views 34

आशा कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू किंवा अंपगत्वाबद्दल सानुग्रह अनुदानाबाबत शासन आदेश जारी

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कामाचं स्वरुप लक्षात घेऊन त्यांना कर्तव्य बजावताना मृत्यू आला तर १० लाख रुपये आणि कायमस्वरुपी अपंगत्व आलं तर ५ लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केले असून १ एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू कर...

August 27, 2024 4:58 PM

views 61

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून दुबईत सुरु होणार

महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं सुरुवात होणार आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली.  विश्वचषक स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलँड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्...

August 27, 2024 7:16 PM

views 56

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आह...

August 27, 2024 3:48 PM

views 70

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा विद्यापीठास समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारणा विद्यापीठाला समूह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या समूह विद्यापीठात वारणानगर इथल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, या महाविद्यालयासह यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, तात्यासाहेब कोरे क...

August 27, 2024 3:43 PM

views 52

छत्रपती शिवाजी महाराजांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी राज्य शासनानं भारतीय नौदलाशी समन्वय साधून १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं मंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं. त्यांनी राजक...

August 27, 2024 1:47 PM

views 50

मल्याळम चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन यांचं निधन

मल्याळम चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक मोहन यांचं आज केरळाच्या कोची इथं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. त्यांनी शालिनी अंटे, कुटुकारी, इलाक्कानागल, मंगलम नेरुन्नू, पक्षे, एडवेला अशा गाजलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

August 27, 2024 1:44 PM

views 24

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव रणजीत चव्हाण यांनी अग्नी दिला. नांदेडचे  पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तसंच मराठवाड्या...

August 27, 2024 1:41 PM

views 37

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू

त्रिपुरामध्ये पूरग्रस्त भागात अद्याप मदतकार्य सुरू आहे. काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलं आहे. राज्यात सध्या ४७१ मदत केंद्र सुरू असून त्यात सुमारे ७० हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. या पुरामुळे त्रिपुरातले रस्ते पूल यांचं नुकसान झालं असून त्रिपुरा राज्य सरकारनं हे नुकसान १ हजार ८२५ कोटी रुपये इतकं असल्याच...

August 27, 2024 1:33 PM

views 66

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु

जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात तयारी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूंछ इथून सुरणकोट, मेंढार आणि हवेली विधानसभा मतदारसंघातल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली आहेत. यावेळी निवडणूक अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या...

August 27, 2024 1:28 PM

views 59

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलाची आज पहिली बैठक

वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, ...