October 20, 2024 1:33 PM

views 16

केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांना अटक

तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या गट १ सेवेच्या उमेदवारांचं समर्थन करत सुरु असलेल्या विरोध प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल तेलंगणा पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय कुमार यांना अटक केली. हे उमेदवार भरती प्रक्रिया आणि आरक्षणासंदर्भात सरकारच्या काही आदेशांच्या अंमलबजावणीला विरोध दर्शवत मुख्य परीक्षा ...

October 20, 2024 1:27 PM

views 26

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्याआधी पक्षाला विचारात घेतलं नाही – मनोज कुमार झा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही, असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी म्हटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागांवर तर राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक...

October 20, 2024 1:28 PM

views 26

दिल्लीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेबाहेर स्फोट

दिल्लीतल्या रोहिणी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेबाहेर आज सकाळी स्फोट झाल्याचं वृत्त आहे. घटनेचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. स्फोटात कोणीही जखमी झालेलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून जवळच्या दुकानाच्या काचेचं आणि दुकानाजवळ उभ्या असलेल्या गाडीच्या काचांचं नुकसान झालं आ...

October 20, 2024 1:30 PM

views 42

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

राजस्थानमधल्या धौलपूर इथं राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या अधिक आहे. लग्नसमारंभाहून परत येत असताना बस आणि रिक्षा एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला. बस चालक आणि वाहक दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना जि...

October 20, 2024 1:17 PM

views 13

‘कृषी उत्पादनांचा भाव आणि बाजारातल्या किरकोळ विक्री किंमतीतली तफावत कमी करण्यासाठी समिती स्थापन करणार’

कृषी उत्पादनं आणि बागायती उत्पादनांचा शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि या उत्पादनांची बाजारातली किरकोळ विक्री किंमत यातली तफावत कमी करण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत एका कृषी परिषदेत बोलत होते. शेतकरी आपलं भाजीपाला ५ रुपय...

October 20, 2024 1:20 PM

views 70

दिवाळी आणि छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेकडून ५७० विशेष फेऱ्या

दिवाळी आणि छटपूजा या सणांसाठी उत्तर आणि पूर्वेकडच्या राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं ५७० विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसह विविध ठिकाणांहून या फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. १३२ फेऱ्या मुंबईहून, तर १४६ फेऱ्या पुण्याहून निघणार ...

October 20, 2024 10:24 AM

views 35

कसोटी क्रिकेट मालिकेत आज न्यूझिलंड आणि भारत यांच्यात दुसऱ्या डावाचा सामना

बंगळुरु इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझिलंड आज दुसऱ्या डावाची सुरुवात करणार आहे. एमए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझिलंडला जिंकण्यासाठी केवळ 107 धावांची गरज आहे. कसोटीच्या कालच्या चौथ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. सरफराज खानची शतकी खेळी आणि ऋषभ पंतच्...

October 20, 2024 10:23 AM

views 35

महिलांच्या T20 क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान जेतेपदासाठी लढत

महिलांच्या T20 क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत आज दुबई इथं न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विजेतेपदासाठी लढणार आहेत. 2016 नंतर प्रथमच या स्पर्धेचा नवीन विजेता असेल. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होणार आहे.

October 20, 2024 9:58 AM

views 25

बिहारमध्ये पुरग्रस्त नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन मध्यवर्ती पथक पाटण्यात दाखल

बिहारमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय आंतरमंत्रालयीन मध्यवर्ती पथक आज पाटण्यात दाखल होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत हे पथक विविध ठिकाणांची पाहणी करेल तसंच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेईल. गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव पार्थसारथी या सात सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व ...

October 20, 2024 9:44 AM

views 39

रशियाच्या व्यावसायिक क्षेत्रातील आणि ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या भारतीय प्रतिनिधींसाठी मेजवानी

भारत -रशिया यांच्यातील व्यावसायिक संबंध बळकट करण्याच्यादृष्टीनं मॉस्कोतल्या भारतीय दूतावासानं रशियाच्या व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या भारतीय प्रतिनिधींसाठी मेजवानीचं आयोजन केलं. यावेळी भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार यांनी भारत आणि रशिया या दोन्ही देशांतील 80 हून ...