October 22, 2024 7:22 PM

views 62

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात आज जोरदार पाऊस झाला. कडा परिसरात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी शेतातल्या गोठ्यात पाणी शिरल्याने साठवलेलं धान्य आणि इतर साहित्याचं नुकसान झालं. तसंच एका मंदिरावर वीज कोसळल्याने मंदिराचं नुकसान झालं आहे. आष्टी तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या...

October 22, 2024 7:15 PM

views 67

जागतिक बाजारातल्या परिस्थितीमुळं देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

जागतिक बाजारातल्या परिस्थितीमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. सेन्सेक्स ८० हजारांची पातळी तोडण्याच्या उंबरठ्यावर आहे तर निफ्टी २४ हजार ५०० च्या खाली गेला. दिवसअखेर ९३१ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स ८० हजार २२१ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३०९ अंकांनी कोसळून २४ हजार ४७२ अंका...

October 22, 2024 7:13 PM

views 27

गडचिरोलीत पोलीस चकमकीत ठार झालेल्यांमध्ये २ मोठ्या नक्षली म्होरक्यांचा समावेश

गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या २ मोठ्या म्होरक्यांचा समावेश आहे. दोघांवरही प्रत्येकी १६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. या सर्वांची ओळख पटल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज ही माहिती दिली. जया उर्फ भुरी पदा आणि सावजी उर्फ अंकलू तुलावी हे दोघे कालच्या चकमकी...

October 22, 2024 7:11 PM

views 47

नाशिकमध्ये देवळा नगरपंचायतीत भाजपच्या १५ नगरसेवकांचा राजीनामा

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात भाजपनं तिकीट नाकारल्यानं देवळा नगरपंचायतीच्या १५ नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. मागच्या  आठवड्यात डॉक्टर राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं  जाहीर केलं  होतं.  परंतु, भाजपनं पहिल्या यादीत डॉ....

October 22, 2024 7:04 PM

views 65

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांची पक्षाला सोडचिठ्ठी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी माजी मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं.  

October 22, 2024 6:47 PM

views 86

काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल – बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल, असंही ते म्हणाले.    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली य...

October 22, 2024 6:32 PM

views 30

न्यायालयाचा हस्तक्षेप कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

न्यायालयाचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट असला पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे गांधीनगर इथं गुजरात विधानसभेच्या आमदारांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कायदा सुस्पष्ट आणि त्रुटीविरहीत असला की त्याची अंमलबजावणी करणंही सोपं होईल, आणि लोक...

October 22, 2024 7:24 PM

views 50

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करायला आजपासून सुरुवात झाली. विविध ठिकाणी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली.     अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्यात अपक्षांचे ६ अर्ज दाखल झाले. यात फलटण विधानसभा मतदारसंघासाठी दोन,  कोरेगाव मतदार संघासाठी दोन, कराड उ...

October 22, 2024 4:48 PM

views 74

नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड शहर आणि परिसरात तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या ...

October 22, 2024 8:50 PM

views 35

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल – गृहमंत्री अमित शाह

देशातल्या सर्व ८ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये आणंद इथं राष्ट्रीय दुग्धविकास महासंघाच्या हीरक महोत्सवी समारंभात बोलत होते.    देशात दुग्धोत्पादन क्षेत्रात ६ दरवर्षी टक्के दरानं वाढ होत असून ज...