October 26, 2024 6:06 PM

views 37

कर्मचारी राज्य विमा योजनेत ऑगस्ट महिन्यात २० लाख ७४ हजार नव्या कामगारांची भर

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात कर्मचारी राज्य विमा योजनेत २० लाख ७४ हजार नव्या कामगारांची भर पडली आहे. तसंच २८ हजार ९१७ आस्थापनांना ही विमा सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दिली. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत नव्या नोंदण्याचं प्रमाण ६ पूर्णांक ८ दशांश टक्के आहे, असं ...

October 26, 2024 7:30 PM

views 62

महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाने आपली २२ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यात माळशिरसमधून उत्तम जानकर, फलटण इथून दीपक चव्हाण, खडकवासला इथून सचिन दोडके, अकोले इथून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड इथून संदीप क्षीरसागर, गंगापूरमधून सतीश चव्हाण, येवल...

October 26, 2024 5:59 PM

views 34

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात चर्चा

उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांची अदलाबदल करण्यासंदर्भात आज चर्चा झाली. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. १८० पेक्षा अधिक जागा लढण्याचं महाविकास आघाडीचं लक्ष्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. जागावाटपाच्या चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत चालू असतात, महाविकास आघाडीचे...

October 26, 2024 5:46 PM

views 34

जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

डिजिटल समावेशकता आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रात जागतिक बँकेनं ग्लोबल साऊथसाठी परिवर्तनीय अनुभवासह नवकल्पनांची द्विपक्षीय देवाणघेवाण करावी, असं आवाहन केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. त्या  वॉशिंग्टन इथं जागतिक बँकेच्या वार्षिक सभेत “भविष्यकालीन जागतिक बँक समूह” ...

October 26, 2024 5:44 PM

views 63

ज्ञानवापी संकुलाचं संपूर्ण सर्वेक्षण एएसआय मार्फत पुन्हा करण्याबाबत दाखल याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळली

उत्तर प्रदेशातल्या ज्ञानवापी संकुलाचं संपूर्ण सर्वेक्षण ए एस आय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत पुन्हा एकदा करण्याबाबत दाखल याचिका वाराणसी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेली ही याचिका वरिष्ठ पीठाचे नागरी न्यायमूर्ती युगल शर्मा यांनी फेटाळली आहे. ए एस आय नं य...

October 26, 2024 3:30 PM

views 41

उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवस अखेर ९९१ उमेदवारांचे बाराशे ९२ उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवस अखेर ९९१ उमेदवारांचे बाराशे ९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत; ३० ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होईल आणि ४ नोव्हेंबरपर्यंत...

October 26, 2024 3:28 PM

views 67

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. २३ उमेदवारांच्या यादीत काँग्रेसनं राळेगाव इथून माजी मंत्री वसंत पुरके, सावनेरमधून अनुजा केदार, अर्जुनी-मोरगाव इथून दिलीप बनसोड, जालन्यातून कैलास गोरंट्याल आण...

October 26, 2024 10:53 AM

views 61

झारखंड निवडणुकीचे 1 हजार 609 उमेदवारी अर्ज दाखल

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकंदर 1 हजार 609 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काल संध्याकाळी संपली. बरकट्ठा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 70 अर्ज दाखल झाले. या पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबरला 43 मतदारसंघांसाठी मतदा...

October 26, 2024 10:43 AM

views 40

प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचं निधन

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉक्टर रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं, त्या 72 वर्षांच्या होत्या. बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात त्या कार्यरत होत्या. मुळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या रोहिणी गोडबोले यांचं प्राथमिक शिक्षण हुजुरपागा शाळे...

October 26, 2024 10:39 AM

views 71

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर,उत्तर रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर, उत्तर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासून पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत विशेष गाड्यांच्या 195 अतिरिक्त फेऱ्या चालवणार आहे. या गाड्या प्रामुख्याने नवी दिल्ली आणि आनंद विहार रेल्वे स्थानकांवरून पूर्वेकडील प्रदेशांसाठी रवाना होतील.   उत्तर रेल्...