October 28, 2024 10:34 AM

views 59

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता निकृष्ट श्रेणीत

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री आठ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 347 इतका नोंदवला गेला. बुधवारपर्यंत हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट श्रेणीतच राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली ...

October 28, 2024 10:07 AM

views 72

मुंबईतील निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध

दिवाळी सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेत मध्य आणि पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई विभागातील निवडक प्रमुख स्थानकांवरफलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेच्या जनसंप...

October 28, 2024 3:16 PM

views 69

दीपावलीच्या मंगलपर्वाला वसुबारसपासून प्रारंभ

देशभरात दीपावलीच्या मंगलपर्वाला आज, गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून प्रारंभ झाला. आज, गायवासराची पूजा करून दिवाळीची सुरुवात होईल. येत्या रविवारपर्यंत चालणाऱ्या या प्रकाशोत्सवानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र चैतन्याचं वातावरण आहे. मनोवेधक रोषणाईनं बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या...

October 28, 2024 9:41 AM

views 107

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील अमरेली इथं दूरस्थ माध्यमातून भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. सुमारे १ हजार १०० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मार्गाची लांबी १०१ किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधील कच्छ भागात स्वस्त वाहतूक आणि आर्थिक ...

October 28, 2024 8:47 AM

views 27

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीत ९ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट क्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा या गर...

October 28, 2024 8:43 AM

views 30

अनेक मतदारसंघात पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा, अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस

राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश आह...

October 28, 2024 9:44 AM

views 26

स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ काल रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असून अठरा वर्षानंतर स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा होत आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्पेनच्या पंतप्रधानांबरोबर शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार...

October 27, 2024 8:40 PM

views 47

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत

न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघ पराभवाच्या छायेत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात नऊ बाद २५९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवनं चार, दीप्ती शर्मानं दोन, तर सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद ...

October 27, 2024 8:18 PM

views 36

भारताची अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल- केंद्रीय मंत्री डॉ.  जितेंद्र सिंह

भारताची अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.  जितेंद्र सिंह यांनी म्हटलं  आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीला  दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकारने अंतराळ क्षेत्रासाठी एक हजार कोटी रुपयांचा उद्यम भांडवल निधी सुरू केला आहे तसंच  जैव-अर्थव्...

October 27, 2024 8:14 PM

views 52

जपानमध्ये कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

जपानमध्ये कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या ५० व्या निवडणुकीत ४६५ जागांपैकी २८९ जागांवर थेट निवडणुकीच्या माध्यमातून खासदार निवडले जातील, तर आणखी १७६ खासदार हे देशातल्या ११ मतदारसंघांमधून मतदारसंघाच्या आकारानुसार असलेल्या प्रमाणात प्रातिनिधिक स्वरुपात निवडले जातील. LDP अर्थात, लिबरल ...