October 28, 2024 8:03 PM

views 42

इजिप्त अध्यक्षांनी गाझापट्टीवर दोन दिवसांच्या युद्धबंदीचा ठेवलेला प्रस्ताव इस्त्रायल प्रधानमंत्र्यांनी फेटाळला

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांनी  गाझापट्टीवर दोन दिवसांच्या युद्धबंदीचा  ठेवलेला प्रस्ताव इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी आज फेटाळला. अनेक  पॅलिस्टिनी कैद्यांच्या बदल्यात चार इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी या युद्धबंदीची मागणी सिसी यांनी अल्जेरियाचे अध्यक्ष अब्द...

October 28, 2024 8:01 PM

views 46

प्रधानमंत्री उद्या 12 हजार 850 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, आरोग्य क्षेत्राशी निगडीत 12 हजार 850 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य विम्याची व्याप्ती 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढवली जाणार आहे. तसंच अखिल भारतीय आयुर्वेदीक संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचंही उद्...

October 28, 2024 7:48 PM

views 45

भारतीय नौदलाचा स्वावलंबन – 2024 चा तिसरा वर्धापन सोहळा

नवोन्मेष आणि संशोधनाला चालना देण्यासाठी तरुण उद्योजकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचं  नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय नौदलाच्या नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन परिषद, स्वावलंबन - 2024 च्या तिसऱ्या वर्धापन सोहळ्याचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. ...

October 28, 2024 7:39 PM

views 18

भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे आणि या प्रगतीत तरुणांचा महत्त्वाचा वाटा – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे आणि या प्रगतीत तरुणांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं मत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या १३ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. नवीन आणि सशक्त राष्ट्र घडवण्याची जबाबदारी तरुणांवर अ...

October 28, 2024 8:03 PM

views 61

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांची प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा

स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली. महितीतंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण, सुरक्षा, पुर्ननवीकरणीय ऊर्जा आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्यांवरही उभय नेत्यांनी चर्चा केली. परराष्ट्रव्यवहार म...

October 28, 2024 7:08 PM

views 80

शेअर बाजार पुन्हा तेजीत, सेन्सेक्समधे ६०३, तर निफ्टीत १५८ अंकांची वाढ

पाच दिवसांच्या मंदीनंतर आज देशातला शेअर बाजार तेजीत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ६०३ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५८ अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३३९ अंकांवर बंद झाला. बँक, वस्तू, दूरसंवाद, आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्यांना ...

October 28, 2024 6:51 PM

views 41

काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अनिस अहमद यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मुंबईत राजगृह इथं हा पक्ष प्रवेश झाला. अनिस अहमद यांना वंचित बहुजन आघाडीने नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

October 28, 2024 6:48 PM

views 57

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. माणमधून प्रभागर घार्गे, काटोलमधून माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख, तर खानापूरमधून वैभव पाटील यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दौंडमधून रमेश थोरात, वाईतून अरुणादेवी पिसाळ, पुसदमधून...

October 28, 2024 6:45 PM

views 55

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आणखी २५ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. वर्सोव्यातून भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह, माळशिरसमधून राम सातपुते, आष्टीतून सुरेश धस, सावनेरमधून आशिष देशमुख यांच्यासह इतरांची नावं यात आहेत. बोरीवलीतून संजय उपाध्याय, कारंज्यातून सई डहाके, वसईतून स्नेहा दुबे, लातूर...

October 28, 2024 6:44 PM

views 43

ईडीची बँक घोटाळा प्रकरणात नागपूरच्या एका व्यावसायिकाच्या मालमत्तेवर टाच

बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने नागपूरच्या एका व्यावसायिकाची सुमारे ५०३ कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मेसर्स कॉर्पोरेट पॉवर लिमिटेड आणि त्यांच्या प्रवर्तकांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि आंध्रप्रदेशातल्या विविध ठिकाणाहून जप्त केल्या आह...