October 29, 2024 7:34 PM

views 43

महिला क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे अहमदाबाद इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा सामन्यातला एक चेंडू बाकी असताना २३२ धावांवर आटोपला. ब्रुक हॅलिडेच्या ८६ धावांमुळे त्यांच्या धावसंख्येला आकार मिळाला. भारतातर्...

October 29, 2024 7:31 PM

views 79

नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२५ वा दीक्षांत सोहळा

नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२५ वा दीक्षांत सोहळा आज पार पडला. या सोहळ्यानंतर १०८ पुरुष आणि ३ महिला असे एकूण १११ पोलीस उपनिरीक्षक आपलं प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस पथकात दाखल झाले. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक नवल बजाज हे या सोहळ्याला उपस्थित होते.  यावेळी प्रशिक्षीत पो...

October 29, 2024 7:28 PM

views 52

जागतिक अस्थिरतेच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारांमध्ये वाढ

जागतिक अस्थिरतेच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर आजही भारतीय शेअर बाजारांमध्ये वाढ दिसून आली. दुपारच्या सत्रापर्यंत घट होत असताना बाजार बंद होताना वाढ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ३६४ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ३६९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १...

October 29, 2024 7:25 PM

views 35

बुलडाण्यात नागपूर मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू, तर ८ जण गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यातल्या नागपूर मुंबई महामार्गावर नांदुरा शहरालगत आज सकाळी ट्रॅक्टर आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर ८ जण गंभीर जखमी झाले. हा ट्रॅक्टर कापूस वेचणीसाठी जाणाऱ्या मजुरांची वाहतूक करत होता. जखमींना मलकापूर तसंच खामगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्त...

October 29, 2024 7:17 PM

views 60

सरकारनं लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांना पंधराशे रुपये दिले तरी गेल्या २ महिन्यात महागाईत वाढ -नाना पटोले

महायुती सरकारने लाडक्या बहिण योजनेद्वारे महिलांना पंधराशे रुपये दिले असले तरी गेल्या २ महिन्यात महागाईत वाढ झाली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महायुतीने काँग्रेसच्या विरोधात प्रसारित केलेल्या व्हिडीओला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्रात लहान मुलीवर अत्याचार होत...

October 29, 2024 7:08 PM

views 35

भारत-स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर -स्पेन प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ

भारत – स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील असं स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी म्हटलं आहे. मुंबईत चौथ्या स्पेन- भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल असा विश्वा...

October 29, 2024 8:22 PM

views 51

आरोग्याशी संबंधित विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन

देशातले नागरिक निरोगी असतील तर देशाच्या प्रगतीला गती मिळते, त्यामुळेच देशात आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याला आपल्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  धन्वंतरी जयंती आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झा...

October 29, 2024 7:16 PM

views 36

शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तिप्रदर्शन करत कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज भरला. संजय शिर...

October 29, 2024 7:20 PM

views 48

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वीणा देव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वीणा देव यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेले काही दिवस  त्या आजारी होत्या. वीणा देव या दिवंगत इतिहास अभ्यासक आणि लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर आज रात...

October 29, 2024 1:47 PM

views 61

भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी – मंत्री नितीन गडकरी

भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबई इथं भारत-स्पेन सीईओ फोरमला ते आज संबोधित करत होते, यावेळी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष एच ई  पेद्रो सँचेज उपस्थित होते. दळणवळ, पायाभूत सुविधा आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये दोन्...