November 4, 2024 3:30 PM

views 59

वृद्धिमान साहाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेला रणजी करंडकाचा हंगाम हा शेवटचा असेल, असं त्याने समाज माध्यमावरच्या संदेशात लिहिलं आहे. साहा याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत ४० कसोटी आणि ९ एकदिवसीय...

November 4, 2024 3:24 PM

views 41

ई बाजारपेठेत १७० पिकांची बियाणी विक्रीसाठी उपलब्ध

केंद्रसरकारच्या ई बाजारपेठेत आता १७० पिकांची बियाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील. आगामी रबी हंगामासाठी उपलब्ध केलेल्या या बियाणांमधे आठ हजारपेक्षा जास्त प्रजातींचा समावेश आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या कंपन्यांना देशभरात कुठूनही कुठेही ती खरेदी करता येतील. ई मार्केटप्लेस वर सर्व नियम आणि प्रक्रीयांचं काट...

November 4, 2024 7:24 PM

views 76

देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकी अध्य पदाची निवडणूक आणि फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढावा समितीची बैठक या दोन कारणांमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सकाळी ११ वाजेच्या सुमाराला सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभरातल्या निचांकी पातळीवर होते. नंतर त्यात सुधारणा दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स ९४२ अंकांनी घसरुन ७८ हजार ७८२ अं...

November 4, 2024 3:10 PM

views 40

आसामच्या लोकांना भाषा गौरव सप्ताहाच्या प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आसामच्या लोकांना भाषा गौरव सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आसाममध्ये भाषा गौरव सप्ताह येत्या ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची समाजमाध्यमावरील पोस्ट शेअर करताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले की आसामी भा...

November 4, 2024 2:56 PM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई आणि मुंबई इथं या सभा होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

November 4, 2024 1:52 PM

views 49

ऑस्ट्रेलियात भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं उद्घाटन

ऑस्ट्रेलियात ब्रिसबेन इथं भारताच्या पहिल्या महावाणिज्य दुतावासाचं परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी आज उद्घाटन केलं. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ संबंध असून, व्यापार तसंच शैक्षणिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी योगदान देणार असल्याचं एस जयशंकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. बैठकीद...

November 4, 2024 1:50 PM

views 63

भारतातील क्षयरोग रुग्ण संख्येत 17 टक्क्यांची घट

भारताने २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या कालावधीत देशातील क्षयरोगाचं प्रमाण सुमारे १७ टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, क्षयरोगाचा प्रसार कमी करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.   'क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये झालेली घट हे भारताच्या समर्पित आणि ...

November 4, 2024 1:46 PM

views 37

अमेरिकेत झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला ४ सुवर्णांसह १७ पदकं

अमेरिकेत कोलोरॅडो इथं झालेल्या १९ वर्षाखालील जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिलांच्या गटात चार सुवर्णांसह १७ पदकं मिळवली. १९ खेळाडूंच्या भारतीय संघात १२ खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले, प्रत्येक महिला खेळाडूने पदक जिंकलं. चार सुवर्णपदक विजेत्यांमध्ये हेमंत सांगवान आणि महिला खेळाडू क्रिशा ...

November 4, 2024 1:40 PM

views 10

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरु डॉ. अजित रानडे यांनी पदाचा दिला राजीनामा

पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरु डॉ. अजित रानडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं डॉ. रानडे यांनी कुलपती संजीव सन्याल यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.   मात्र या पदासाठी आपल्या अर्हतेत उणीव होती असा या राजीनाम्याचा अर्थ ...

November 4, 2024 8:18 PM

views 48

अमेरिकेत उद्या अध्यक्षपदासाठी मतदान

अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी सकाळी साडे पाच ते साडे नऊ दरम्यान मतदान होईल. मतदान बंद होताना निवडणुकीचे निकाल अपेक्षित असले तरी याचा अंतिम निर्णय काही दिवसानंतर होईल. तत्पूर्वी टपाली मतदानाने अनेकांनी आपलं मत आधीच नोंदवल...