November 5, 2024 2:36 PM

views 62

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात प्रचार दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राळेगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राळेगाव इथं चार वाजता मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंका...

November 5, 2024 2:57 PM

views 53

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आजपासून दर्शनासाठी २४ तास खुलं

श्रीक्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशी निमित्त आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर चोवीस तास भाविकांसाठी खुलं असणार आहे.

November 5, 2024 1:49 PM

views 29

अंदमान-निकोबार द्वीप समूहांच्या प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार पाऊस

अंदमान-निकोबार द्वीप समूहांच्या प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तामिळनाडू, पुडुचेरी, करैकल, केरळ, माहे आणि कर्नाटकच्या दक्षिण भागातही या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.   राजधानी दिल्लीमध्ये पुढले २ ते ३ दिवस वातावरणात धुरकं आणि काही प्रमाणात धुक...

November 5, 2024 1:46 PM

views 14

भारत ब्रँड आटा आणि तांदळाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीत भारत ब्रँड आटा आणि तांदूळ च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं ते यावेळी म्हणाले. भारत ब्रँड आटा ३० र...

November 5, 2024 1:40 PM

views 23

टेबलटेनिस अजिंक्यपद स्पर्धेत श्रीजा अकुलाची एड्रियाना दियाझ बरोबर लढत

जागतिक टेबलटेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताची श्रीजा अकुला आज पहिल्या फेरीत पोर्टो रिकोच्या एड्रियाना दियाझ बरोबर खेळणार आहे. मनिका बात्राने दक्षिण कोरियाच्या शिन युबिन बरोबरचा सामना गमावल्यामुळे ती स्पर्धेबाहेर फेकली गेली आहे. 

November 5, 2024 7:22 PM

views 28

अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा शेअर बाजारावर परिणाम

अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा नकारात्मक प्रभाव आज जागतिक बाजारात उमटला. मुंबई शेअर बाजारातही आज दिवसभर मोठे चढ-उतार दिसून आले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६९४ अंकांनी वधारला आणि ७९ हजार ४७७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...

November 5, 2024 1:51 PM

views 65

FTIIच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लघुपटाला ऑस्कर पुरस्काराचं नामांकन

पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या Sunflowers Were the First Ones to Know या लघुपटाला ऑस्कर पुरस्कारांच्या लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या प्रकारात नामांकन मिळालं आहे.   चिदानंद नायक याचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटानं यंदाच्या कान चित्रपट महोत्सवा...

November 5, 2024 1:27 PM

views 32

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड मधल्या गढवा इथं केली.   ते आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड चे प्रभ...

November 5, 2024 8:15 PM

views 68

अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

अमेरिकेच्या ४७व्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी सीमा सील करण्याची ग्वाही दिली असून कोट्यवधी रुपयांच्या करकपातीचा प्रस्ताव दिला आहे तर ह...

November 5, 2024 1:13 PM

views 51

जगाला करुणेची गरज- राष्ट्रपती

भारताला प्रत्येक युगात थोर मार्गदर्शक लाभले असून, यामध्ये भगवान गौतम बुद्धांचं स्थान अढळ आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं आयोजित पहिल्या आशियाई बौद्ध परिषदेला संबोधित करत होत्या. सिद्धार्थ गौतम यांना बोधगया इथं बोधी वृक्षाखाली झालेली ज्ञानप्राप्ती, ही इतिहा...