November 6, 2024 10:23 AM

views 36

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचं सात किलोमीटरचं पायाभूत काम पूर्ण

धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचं सात किलोमीटरचं पायाभूत काम पूर्ण झालं आहे. कामाचा वेग असाच कायम राहिल्यास, आपण ठरवलेल्या उद्दिष्टानुसार पुढील २४ महिन्यांच्या आत कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत रेल्वेमार्गाचं काम नक्की पूर्ण होईल, असा विश्वास, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्...

November 6, 2024 10:20 AM

views 33

मतदान जनजागृतीसाठी परभणीत निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर, मी मतदान करणार असे स्टिकर्स

मतदान जनजागृती करण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाच्यावतीनं, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर, मी मतदान करणार, असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तसंच कलापथकांच्या वाहनांवर आवाजाचे भोंगे लावून मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

November 6, 2024 10:17 AM

views 63

केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा घेणार आढावा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाच वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेतला जाईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ही माहिती दिली.

November 6, 2024 10:13 AM

views 53

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली.  ‘‘राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्र असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांग...

November 6, 2024 10:09 AM

views 59

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं लातूर ग्रामीण विधानसभेतले मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.  

November 6, 2024 9:33 AM

views 43

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात येत्या ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यात येत्या आठ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत. आठ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिक, नऊ तारखेला अकोला आणि नांदेड, १२ तारखेला चंद्रपूर, चिमूर, सोलापूर आणि पुणे आणि १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत पंतप्रधानांच्या सभा हो...

November 6, 2024 9:28 AM

views 38

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. या सभेला...

November 6, 2024 9:19 AM

views 51

यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान

मराठी रंगभूमी दिनाच्या औचित्याने, अखिल महाराष्ट्र विद्यामंदिर समितीच्या वतीनं दिलं जाणारं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांना काल सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रदान करण्यात आलं. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते सुहास ज...

November 6, 2024 9:17 AM

views 62

मतदार जागृतीसाठी राबविली जाणार विशेष मोहीम – एस.चोक्कलिंगम

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व विभागांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या जनजागृतीच्या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत केलं. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेख...

November 6, 2024 9:08 AM

views 76

श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत

धाराशिव तालुक्यातील तेर इथल्या श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं काल धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. ही पालखी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही पालखी तेरहून निघून कार्तिकी एकादशीला पंढरपुरात पोहोचते.