November 6, 2024 6:29 PM

views 39

नौदलाच्या ‘कोकण रत्न’ मोहिमेला रत्नागिरीत सुरुवात

नौदलाच्या खुल्या समुद्रातील नौकानयन 'कोकण रत्न' मोहिमेला आज रत्नागिरीत अल्ट्रा टेक जेट्टी इथं सुरुवात झाली. या मोहिमेला 'हमारा समंदर- हमारी शान' असं नाव देण्यात आलं आहे. समुद्राची स्वच्छता, तस्करी आणि सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. १० दिवस चालणारी ही मोहीम रत्नागिरीहून ...

November 6, 2024 6:17 PM

views 44

कार्तिकी यात्रेनिमित्त ३ विशेष अनारक्षित रेल्वेगाड्या

पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ३ विशेष अनारक्षित गाड्या चालवणार आहे. ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून या गाड्या चालवण्यात येणार आहेत. लातूर-पंढरपूर-लातूर ही गाडी १२ आणि १३ नोव्हेंबरला चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.    ...

November 6, 2024 6:03 PM

views 63

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका संशयिताला पुण्यातून अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एका संशयिताला पुण्यातून अटक केली आहे. गौरव अपुणे असं या २३ वर्षीय संशयिताचं नाव आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकंदर १६ जणांना अटक करण्यात आली आहे.

November 6, 2024 3:27 PM

views 68

धुळ्यात ८ नोव्हेंबरला विनापरवाना ड्रोन उडवण्यास प्रतिबंध

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा धुळ्यात येत आहेत. धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांझरापोळ गोशाळा इथं प्रधानमंत्री येणार आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने परवा म्हणजे ८ नोव्हेंबरला या भागात विनापरवाना ड्रोन उडवण्यास प...

November 6, 2024 3:23 PM

views 42

जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री गैरहजर राहतात – शरद पवार

जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री उपस्थित राहत नसल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बारामतीमध्ये काल ते व्यापाऱ्यांना संबोधित करत होते. जीएसटी परिषदेच्या बैठकीला राज्याचे अर्थमंत्री सातत्याने गैरहजर राहतात. त्यामुळं राज्याची भूमिका मांडली जात नाही. केंद्रीय अर्थ...

November 6, 2024 3:17 PM

views 68

‘भाजप धर्माच्या नावावर द्वेष पसरवून मुस्लीम समाजाला भीती दाखवण्याचं काम करतो’

भारतीय जनता पक्ष धर्माच्या नावावर द्वेष पसरवून मुस्लीम समाजाला भीती दाखवण्याचं काम करतो आहे अशी टीका एमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धुळ्यात झालेल्या जाहीर सभेत केली. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातले एमआयएम पक्षाचे उमेदवार आमदार फारुख शहा यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा झाली, त्यात ओव...

November 6, 2024 3:12 PM

views 67

आपलं सरकार फुकट गोष्टी देण्याऐवजी महिलांना सक्षम करेल – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळच्या राळेगाव इथल्या सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी लाडकी बहीण योजनेवरुनही त्यांनी टीका केली. आपलं सरकार असल्या फुकट गोष्टी देण्याऐवजी महिलांना सक्षम करेल आणि त्यांच्या हाताला काम देईल असाही विश्वास त्यांनी दिला. विकासा...

November 6, 2024 3:24 PM

views 43

पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू – उद्धव ठाकरे

आपलं सरकार आलं, तर शेतकऱ्यांचं नुकसान न करता तेल, डाळ, साखर, तांदूळ, गहू या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षं स्थिर ठेवून दाखवू, असं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. रत्नागिरी जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्र...

November 6, 2024 7:56 PM

views 41

भारतीय राज्यघटना हा फक्त ग्रंथ नसून जगण्याचा मार्ग आहे – राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून राज्यघटनेवर ...

November 6, 2024 2:02 PM

views 42

भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना केलं निलंबित

भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.