November 10, 2024 8:09 PM

views 62

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना गकेबेरा इथं सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला.  भारताच्या फलंदाजीची सुरुवात मात्र खराब झाली. संघाच्या केवळ ५ धावाच झाल्या असताना भारताचे दोन्ही सलामीवर तंबूत परतले. त्यानंतर क...

November 10, 2024 8:02 PM

views 56

रशिया आणि युक्रेनकडून परस्परांवर ड्रोनचा बेछूट मारा

रशिया आणि युक्रेन यांनी काल रात्रभर परस्परांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. काल रात्री रशियानं एकूण १४५ ड्रोन्स सोडले. एकाच रात्रीतला हा सर्वात मोठा ड्रोनचा मारा होता. आज सकाळी युक्रेननं मॉस्कोवर ३४ ड्रोन्सचा मारा केला. २०२२ मधे हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियावर राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा...

November 10, 2024 7:59 PM

views 28

ज्येष्ठ अभिनेते दिल्ली गणेश यांचं वार्धक्यानं निधन

ज्येष्ठ अभिनेते दिल्ली गणेश यांचं आज चेन्नई इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. रंगभूमीवर अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु केल्यानंतर ते चित्रपटांमधून भूमिका करु लागले. पाच दशकांच्या कारकिर्दित त्यांनी विविध भाषांमधल्या ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमधे भूमिका केल्या. मुख्यत्वे तामिळ चित्रपटांमध...

November 10, 2024 7:56 PM

views 45

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये पहिल्यांदा एका मुलाला बर्डफ्ल्युची लागण

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका कुमारवयीन मुलाला बर्डफ्ल्युची लागण झाली असून एच-५ या विषाणूमुळे कोंबड्या आणि पक्षांना होणाऱ्या या आजाराची लागण माणसांना व्हायची त्या देशातली ही पहिलीच वेळ आहे. लहान मुलांसाठीच्या विशेष रुग्णालयात या मुलावर उपचार सुरु असून अशी लागण होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला...

November 10, 2024 7:53 PM

views 34

‘दुबई’ शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमध्ये सर्वोच्च स्थानावर, जागतिक पातळीवर पाचव्या स्थानी

ग्लोबल सिटी इंडेक्स २०२४ या अहवालाच्या आकडेवारीनुसार दुबई हे शहर पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतल्या शहरांमधून प्रथम क्रमांकावर असलेलं शहर म्हणून उदयाला आलं असून सलग दोन वर्षं ते सर्वोच्च स्थानावर आहे. सिंगापूर, लॉस एंजेलिस, सिडनी, सॅन फ्रान्सिस्को, ॲमस्टरडॅम अशा शहरांना मागे टाकून दुबईने जागतिक पातळीवर प...

November 10, 2024 7:47 PM

views 43

जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कनिष्ठ अधिकारी शहीद, तीन जवान जखमी

जम्मू-कश्मीरमधे किश्तवार जिल्ह्याच्या दुर्गम जंगल भागात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कनिष्ठ अधिकारी शहीद झाला, तर तीन जवान गंभीररित्या जखमी झाले. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर संयुक्त शोधमोहिम करणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. शोधमोहिम अजूनही सुरु आहे.

November 10, 2024 7:03 PM

views 43

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश – गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात शिगेला पोचला असून, आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रोड शो इत्यादींच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज राज्यात प्रचारदौरा केला.    तत्त्वांसोबत तडजोड करत कसंही करून सत्तेत येणं हा महा...

November 10, 2024 7:17 PM

views 39

मविआचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची मुख्यंमत्र्यांची टीका

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची टीका मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे इथं आज त्यांनी प्रचारासाठी रॅली काढली, तेव्हा ते बातमीदारांशी बोलत होते. महायुतीनं ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केली, तेव्हा पैसे कुठून आणणार असं म्हणत आमच्याविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्...

November 10, 2024 6:50 PM

views 41

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

राज्यातला शेतकरी शेतमालाला हमीभाव मागत आहे, मात्र भाजपाचे नेते इतर मुद्यांवर बोलून दिशाभूल करत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगोला इथल्या प्रचारसभेत केली. काश्मीरमधलं ३७० कलम हटवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात मात्र काश्मीरमधले दहशतवादी हल्ले अजूनही थांबले नाहीत, भाज...

November 10, 2024 6:42 PM

views 33

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – शरद पवार

लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी स्पष्ट कौल न दिल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण सारखी योजना आणली, असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार संविधानाला धक्का पोहोचवेल अशी भिती लोकसभा निवडण...