November 11, 2024 7:09 PM

views 43

शरद पवारांची भाजपावर टीका

लोकसभा निवडणुकीत भाजपानं ४०० हून अधिक जागा मिळवण्याचा निर्धार केला होता, तो पूर्ण झाला असता तर संविधान बदलण्याचा धोका निर्माण होऊ शकला असता, मात्र जनतेच्या जागरूकतेमुळे हे घडलं नाही, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते जळगाव इथं प्रचारसभेत बोलत होते. भारतीय घटनेच्या संरक्षणासाठी सावधान रा...

November 11, 2024 7:02 PM

views 32

मविआचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीचा निवडणूक जाहिरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवली, मात्र आता ते याच योजने अंतर्गत महिलांना तीन हजार रुपये...

November 11, 2024 7:44 PM

views 49

राहुल गांधी अपप्रचार करत असल्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अपप्रचार करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. गांधी यांनी भाजपावर राज्यघटना नष्ट करत असल्याचा खोटा आरोप करत तणाव निर्माण केल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं असून आयोगाने यावर कायदेशीर...

November 11, 2024 6:47 PM

views 70

विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते.    काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्हाला उठ...

November 11, 2024 7:45 PM

views 46

जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा महायुतीला सत्तेतून तडीपार करण्याची पटोलेंची मागणी

भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानं ते हिंदू-मुस्लीम मुद्दा उपस्थित करत आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातले महाविकास आघडीचे उमेदवार साहेबराव दत्तराव कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होत...

November 11, 2024 4:03 PM

views 54

रत्नागिरी जिल्ह्यात थंडीला सुरूवात

रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीपर्यंत सुरु असलेल्या पावसानंतर आता थंडी सुरु झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी धुकं पडत असून तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाली आहे. दापोलीत १५ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं केली आहे...

November 11, 2024 4:00 PM

views 13

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमारला उत्तर प्रदेशातून अटक

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमार याला उत्तर प्रदेशातल्या बहराईच इथून अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचं शिवकुमारनं पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबूल केलं आहे. शिवकुमारला मदत करणारे अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशे...

November 11, 2024 3:56 PM

views 44

सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना जाहीर

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गोव्यात २० नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरू होणार असून २८ नोव्हेंबर...

November 11, 2024 3:38 PM

views 43

राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट – अनिल सोले

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणं हे भाजपाचं उद्दिष्ट असं भाजपा नेेते अनिल सोले यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुती सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी सोले यांनी दिली. संकल्पपत्र बनवण्यासाठी...

November 11, 2024 3:32 PM

views 60

दहिसर पश्चिम इथं दीड किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त

निवडणूक आयोगाच्या निगराणी पथकाने दहिसर पश्चिम इथं जवळपास दीड किलोपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त केलं आहे. याची किंमत एक कोटी ४३ लाख इतकी आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेहिशेबी पैसे आणि संपत्तीची देवाणघेवाण रोखण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात आहे.