November 12, 2024 7:46 PM

views 64

महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला – मुख्यमंत्री

महायुती सरकारने राज्यात विविध विकासकामं केली. महाविकास आघाडीने सरकारने राज्याला वनवास दिला. पण, महायुतीने सुरू केलेल्या योजना मविआने बंद पाडण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसोड इथे केली. महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महायुत...

November 12, 2024 6:20 PM

views 64

देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजी असलेले शेअर बाजार नंतर घसरले आणि व्यवहार संपेपर्यंत ही घसरण वाढत गेली. त्यामुळं सेन्सेक्स ७८ हजारांच्या खाली आणि निफ्टी २४ हजारांच्या खाली बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ८२१ अंकांनी कोसळून ७८ हजार ६७५ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५८ ...

November 12, 2024 6:37 PM

views 49

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही – देवेंद्र फडणवीस

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पालघर जिल्ह्यात डहाणूत ते प्रचारसभेत बोलत होते. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरो...

November 12, 2024 6:38 PM

views 54

मविआ सत्तेत आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर डाळ, तांदूळ, गहू, साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातल्या प्रचारसभेत दिलं. महायुती सरकारच्या काळात शेतमालाला हमीभाव मिळत नाही. महायुतीकडे कोणतेही मुद्दे नसल्याने ते दिशाभूल क...

November 12, 2024 3:34 PM

views 54

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी तयारी पूर्ण

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या पाच, बिहारमधे विधानसभेच्या चार जागांसाठी तर केरळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी उद्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.      आसाममधे ३४ उमेदवार रिंगणात असून ९ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासा...

November 12, 2024 6:54 PM

views 38

सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची शरद पवार यांची टीका

सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे, त्यांनी आज नाशिक जिल्ह्यात कळवण, दिंडोरी, निफाड इथं प्रचार सभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. कांद्याचा भाव वाढला की सरकार निर्यातबंदीचा विचार करून कांद्याचे भाव पाडतं, शेतकरी कर्जबाजारी हाेतात, त्यांना कर्जमाफी मि...

November 12, 2024 2:45 PM

views 45

विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणाऱ्या ज्य...

November 12, 2024 2:34 PM

views 45

देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्याची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते १० ...

November 12, 2024 2:32 PM

views 50

उत्तराखंडमध्ये डेहराडून शहरात झालेल्या भीषण कार अपघातात ६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधे डेहराडून शहरात काल रात्री उशिरा झालेल्या भीषण कार अपघातात ६जणांचा मृत्यू झाला. तर एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव कंटेनरने इनोव्हा कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

November 12, 2024 2:29 PM

views 27

दक्षिण काश्मीरला राजौरी आणि पूँछ भागाला जोडणारा मुघल मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद

जम्मू काश्मीरमधे नव्यानं झालेल्या हिमवृष्टीनंतर, दक्षिण काश्मीरला राजौरी आणि पूँछ भागाला जोडणारा मुघल मार्ग आणि बांदिपोरा- गुरेझ मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सोनमर्गमधे झालेल्या हिमवृष्टीमुळे काल सोनमर्ग- कारगील राष्ट्रीय महामार्गही बंद केल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्या...