November 18, 2024 2:55 PM

views 19

टाटा स्टील बुद्धीबळ भारत स्पर्धेत मॅग्नस कार्लसन याने जिंकला ब्लिट्झ किताब

कोलकाता इथं काल झालेल्या टाटा स्टील बुद्धीबळ भारत स्पर्धेत मॅग्नस कार्लसन याने ब्लिट्झ किताब जिंकला. उपांत्य फेरीत अर्जुन एरिगसी याच्याविरोधात कार्लसन याने बारा गुणांची कमाई केली. अंतिम फेरीत भारताच्याच विदित गुजराती याचा पराभव करून १३ गुणांची कमाई करत कार्लसनने ब्लिट्ज किताबावर आपलं नाव कोरलं. भारत...

November 18, 2024 2:54 PM

views 24

जीटी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत ज्योती वेन्नमला सुवर्ण पदक

लक्झेंबर्ग इथं झालेल्या जीटी खुल्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने काल महिलांच्या कम्पाऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने या स्पर्धेत सुरुवातीपासून शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. बेल्जियमच्या साराह प्रील्स हिच्याविरोधात काल झालेल्या सामन्यात ज्योतीने १४७-१४५ असा विजय मिळवल...

November 18, 2024 2:52 PM

views 44

श्रीलंकेच्या प्रधानमंत्री म्हणून डॉ. हरिणी अमरसूर्य यांनी घेतली शपथ

श्रीलंकेच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज राजधानी कोलंबो इथं अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या उपस्थितीत झाला. प्रधानमंत्री म्हणून डॉ. हरिणी अमरसूर्य यांनी तसंच अन्य २१ जणांनी पदाची शपथ घेतली. 

November 18, 2024 2:46 PM

views 24

दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणावर उपाययोजना करायला उशीर का ? – सर्वोच्च न्यायालय

दिल्लीतल्या वाढत्या प्रदुषणावर उपाययोजना करायला उशीर का केला, असा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन या उपायाची अंमलबजावणी करायला विलंब केल्याबद्दल न्यायालयाने दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यापुढे उपाययोजनांची अंमलबजावणी...

November 18, 2024 2:46 PM

views 39

आम आदमी पार्टीचे कैलाश गहलोत यांचा भाजपात प्रवेश

दिल्लीच्या आम आदमी पार्टी मंत्रिमंडळाचे माजी सदस्य कैलाश गहलोत यांनी आज भाजपामधे प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहरलाल, पक्ष उपाध्यक्ष बैजयंत पांडा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी त्यांचं स्वागत केलं. आम आदमी पार्टीच्या धारणांपेक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा वरचढ...

November 18, 2024 1:36 PM

views 27

क्रिकेट : कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकणार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा येत्या २२ नोव्हेंबरपासून पर्थ इथे सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेचा पहिला सामना खेळू शकणार नाही. ही कसोटी सामन्यांची स्पर्धा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार आहे. शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह हा भारतीय संघाचा कर्णधार असेल. रोहित व्यतिरिक्...

November 18, 2024 1:29 PM

views 45

विकसित भारताचं उद्दिष्ट ठेवून भारताची प्रगतीच्या मार्गावर वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नायजेरियामधून रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी अबुजा इथं संवाद साधला. विकसित भारताचं उद्दिष्ट समोर ठेवून भारतानं प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरु केली आहे असं  ते म्हणाले. आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात भारताने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करुन ते म्हणाले की जगाच्या दृ...

November 18, 2024 1:23 PM

views 33

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आज प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असून ते बेलापूर, सोलापूर  आणि अहिल्यानगर इथं प्रचारसभा घेतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज दुपारी नागपूर आणि नंतर वर्धा इथं जाहीर सभा घेतील. सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उम...

November 18, 2024 1:00 PM

views 69

मणिपूर हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र निषेध

मणिपूरमधे गेले दोन दिवस उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला असून केंद्र आणि राज्य सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांभीर्याने तातडीचे उपाय केले पाहीजेत असं सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून राज्यात दोन समुदायांमधे सुरु झालेला संघर्ष अद्याप धुमसतो आहे. ...

November 18, 2024 1:30 PM

views 49

आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त

ज्येष्ठ नागरिकांसाठी अलिकडेच सुरु केलेल्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेत ७० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थींची संख्या १० लाखापेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सांगितलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या २९ ऑक्टोबरला योजनेचं उद्घाटन केल्यानंतर अवघ्या ३ आठव...