November 18, 2024 8:13 PM

views 62

जर्मनी कुशल व्यावसायिक आणि पदवीधारकांसाठी दोन लाख व्हिसांना वर्ष अखेरपर्यंत मंजुरी देणार

जर्मनी कुशल व्यावसायिक आणि पदवीधारकांसाठी दोन लाख व्हिसांना वर्ष अखेरपर्यंत मंजुरी देणार आहे. व्हिसा देण्याचं प्रमाण  गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यानं वाढलं आहे. जर्मनीत कुशल मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. सध्या तिथं १३ लाख ४० हजार पदं रिक्त आहेत. 

November 18, 2024 7:51 PM

views 56

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते सं...

November 18, 2024 8:10 PM

views 50

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसिना आणि इतर ४५ जणांना एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

विद्यार्थी आंदोलना दरम्यान झालेल्या कथित नरसंहाराच्या दोन प्रकरणात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी लवादानं बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसिना आणि इतर ४५ जणांना एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ९ माजी मंत्र्यांसह  १३ आरोपींना आज लवादासमोर हजर करण्यात आलं.  या प्रकरणाची प...

November 18, 2024 8:07 PM

views 26

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बीकॉमच्या सहाव्या सत्राच्या एटीकेटी परीक्षेसाठी १४ हजार १९१, बीएससी सहाव्या सत्रासाठी २ हजार ९२६ तर बीकॉम अकाउंट अँड फायनान्ससाठी १ हजार ३१ विद्यार्थी बसले होते. सर्व निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहित...

November 18, 2024 8:01 PM

views 65

मुंबईत १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामावर तैनात

विधानसभा निवडणुकीत मुंबईत १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामावर तैनात आहेत. बंदोबस्तासाठी २५ हजारांहून अधिक पोलीस तैनात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. मुंबईत प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असलेली एकंदर ७६ मतदान केंद्रं आहेत. मतदार जनजागृतीसाठी केलेल्या विविध उपाय ...

November 18, 2024 7:59 PM

views 57

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यात १५३ कोटी ...

November 18, 2024 7:58 PM

views 27

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसनायके पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. श्रीलंकेचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री विजिता हेरथ यांनी आज बातमीदारांशी बोलतान ही माहिती दिली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या श्रीलंका दौऱ्यात दिसनायके यांना भारत भेटीचं आमंत्रण दि...

November 18, 2024 7:42 PM

views 73

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा रमेश चेन्नीथला यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर होत असून निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. माजी पोलीस महासंचालक रश्...

November 18, 2024 7:39 PM

views 61

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल-विनोद तावडे

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल, असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितलं. धारावीतल्या लोकांना विस्थापित करण्यात येणार आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली जाणा...

November 18, 2024 7:38 PM

views 56

महायुती सरकार असंविधानिक, भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट-बाळासाहेब थोरात

राज्यातलं महायुती सरकार असंविधानिक आणि भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते आज संगमनेर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात सर्वत्र महायुती सरकार बद्दल प्रचंड राग असून, या निवडणुकीत १८० जागा जिंकून ...