November 24, 2024 3:38 PM

views 50

हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद

राज्य विधानसभा निवडणूक निकालानंतर काल हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला झालेल्या या घटनेत पाच जण जखमी झाले. या गोळीबारात संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे. त्याला हैदराबाद इथल्या रुग्णालयात दाख...

November 24, 2024 2:49 PM

views 80

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मुंबईत पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते या बैठकील...

November 24, 2024 2:48 PM

views 52

टेनिस : भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली जोडीनं एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं

भारताचे टेनिसपटू एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली या दोघांनी इटली इथं झालेल्या एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. त्यांनी काल झालेल्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकित जोडीवर ६-३, २-६, १२-१० अशी मात केली. एटीपी चॅलेंजर टूरमधलं ऋत्विकचं हे दुसरं, तर बालाजीचं पहिलंवह...

November 24, 2024 1:44 PM

views 22

विविध राज्यांतल्या विधानसभांच्या पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट

विविध राज्यांतल्या विधानसभांच्या एकंदर ४८ पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. आसाममधल्या पाचपैकी तीन जागांवर भाजपानं, तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि आसोम गण परिषद या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. बिहारमधल्या चारपैकी दोन जागी भाजपानं, तर प्रत्येकी एका जागेवर हिंदुस्तानी आवाम मोर्च...

November 24, 2024 1:41 PM

views 47

झारखंडमध्ये विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी इंडिया आघाडीची रांचीमध्ये बैठक

झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्याच्या निवडीसाठी घटकपक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज रांची इथं होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार या बैठकीला हजर राहतील. इंडिया आघाडीच्या विधानसभा पक्षनेतेपदी हेमंत सोरेन यांची निवड ...

November 24, 2024 1:36 PM

views 51

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही संभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन करण्यासा...

November 24, 2024 3:17 PM

views 36

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही मतभेद नाहीत – एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत  असं शिंदे यांनी सांगितलं.

November 24, 2024 3:18 PM

views 56

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं, तर काँग्रेस आणि...

November 24, 2024 10:34 AM

views 66

महायुतीचा विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय आहे, असं प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्र विधानसभा आणि विविध राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात काल विजयोत्सव सा...

November 23, 2024 8:51 PM

views 34

बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डीचा उपांत्य सामना खेळणार

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी ही भारतीय जोडी आज दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि सेओ सुंग जाई या जोडीशी उपांत्य सामना खेळणार आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीत इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीनं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शी युकीला उपांत्य स...