November 28, 2024 1:40 PM

views 61

भाजपा पक्ष श्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक

महाराष्ट्रात अद्यापही सरकरस्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आज नवी दिल्लीत महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.    दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व...

November 28, 2024 1:40 PM

views 18

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन चौथ्यांदा घेणार शपथ

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते, हेमंत सोरेन आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. राज्यपाल संतोष कुमार गंगवार, आज संध्याकाळी रांची इथे होणाऱ्या शपथविधी समारंभात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेत...

November 28, 2024 11:22 AM

views 42

फ्रान्स आणि आशिया-पॅसिफिक भागीदार देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्याचं मंत्री गोयल यांचं आवाहन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी फ्रान्स आणि आशिया-पॅसिफिक भागीदार देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्याचं आवाहन केलं आहे. ते काल नवी दिल्लीत, आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठीच्या, फ्रेंच विदेशी व्यापार आयुक्तांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. यामध्ये द्विपक्षीय करार आणि बहुपक्षीय मंचांद्वारे ...

November 28, 2024 11:11 AM

views 30

येत्या शनिवारपर्यंत देशाच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता

नैऋत्य बंगालच्या उपसागरात, श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे येत्या शनिवारपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कमी दाबाच्या पट्टयाचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचं हवामान खात...

November 28, 2024 10:58 AM

views 49

फेंगल चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका

बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेला निर्माण झालेल्या फेंगल या चक्रीवादळचा श्रीलंकेला फटका बसला असून, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जण मृत्युमुखी पडले आहेत. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागात श्रीलंकेची नौदल आणि हवाई दलाची पथके मदतकार्य करत आहेत.

November 28, 2024 1:14 PM

views 55

बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांचं प्रतिपादन

केंद्र सरकारच्या ‘बाल विवाह मुक्त भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा प्रारंभ काल नवी दिल्ली इथं झाला. बालविवाहाच्या रूढीचं निर्मूलन करणं, हा या मोहिमेचा प्राथमिक उद्देश आहे. अभियानासाठी  १३० जिल्ह्यांची निवड झाली असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या मोहिमेचं उद्घाटन करताना सांगितलं....

November 28, 2024 10:38 AM

views 35

‘समाजमाध्यम, ओटीटीवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता’

समाज माध्यमं आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत आणि कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. ते काल लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते. आपल्या देशाची संस्कृती आणि हे प्लॅटफॉ...

November 28, 2024 8:33 AM

views 19

मुख्यमंत्रीपदाबाबत प्रधानमंत्र्यांच्या निर्णय शिवसेनेला मान्य – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही ...

November 28, 2024 8:33 AM

views 39

५५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टरक्लास, आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, अ...

November 27, 2024 8:32 PM

views 36

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता

वक्फ बोर्डासंबधीच्या संयुक्त संसदीय समिती वक्फ बोर्ड कायद्याचा मसूदा येत्या २९ तारखेला पटलावर मांडण्याची शक्यता आहे, परंतू या समितीनं अनेक राज्यांमधल्या बोर्डाच्या हरकती ऐकून घेतलेल्या नाहीत त्यामुळे समितीची मुदत वाढवावी अशी मागणी या समितीचे सदस्य असलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारानी केली आहे. समिती...