December 2, 2024 1:06 PM

views 39

UPI द्वारे ऑक्टोबरमध्ये १६ अब्ज ५८ कोटींहून अधिक व्यवहार

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयद्वारे या वर्षी ऑक्टोबरमध्ये १६ अब्ज ५८ कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमधे सुमारे २३ कोटी ४९ लाख रुपयांची देवाण घेवाण झाली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यात ४५ टक्के वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. नॅशनल पेमेंट कॉ...

December 2, 2024 10:42 AM

views 42

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

ओमान मधील मस्कत इथं सुरू असलेल्या कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा ८-१ असा पराभव करत अ गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना उद्या मलेशियाशी होणार आहे.

December 1, 2024 7:12 PM

views 32

अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा उद्योगपती गौतम अदानी यांचा दावा

अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा उद्योगपती गौतम अदानी यांनी केला आहे. जयपूर इथं आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या कंपनीने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन केलेलं नसून अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही, असं अदानी यावेळी म्हणाले....

December 1, 2024 7:13 PM

views 49

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन

अहिल्यानगर इथं सत्यशोधक समाजाच्या ४२ व्या अधिवेशनाचं उद्घाटन आज साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या प्रबोधन युगाचे पितामह असून त्यांच्या विचारातूूनच लोकशाहीचा पाया घातला गेला असं कानडे यावेळी म्हणाले. उत्तमराव पाटील हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. यावेळी दिशा...

December 1, 2024 7:07 PM

views 88

रब्बी हंगामात ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शासनाकडून उपलब्ध करून दिलं आहे. भविष्यात संपूर्ण राज्यात पीक पाहणी ही पूर्णपणे सुधारित ‘ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी या ॲपद्वारे ठराविक मुदत...

December 1, 2024 7:18 PM

views 50

भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

भुवनेश्वर इथे आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी देशातल्या विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यां...

December 1, 2024 7:05 PM

views 38

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड, तर मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभा गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. तसंच पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची ...

December 1, 2024 7:15 PM

views 39

राज्यात येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार

महायुतीमध्ये कसलाही वाद नाही असं सांगत महाराष्ट्रात  येत्या गुरुवारी 5 डिसेंबर ला शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री बनतील असं त्यांनी काल स्पष्ट ...

December 1, 2024 7:18 PM

views 42

तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार

तेलंगणात, मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान सात जहाल नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव भद्रू उर्फ ​​पपण्णा हा विजापूरचा असून इतर दोन राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी दोन आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही...

December 1, 2024 7:05 PM

views 54

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली फेरमतदानाची मागणी फेटाळली

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडीतली मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवली गेली असं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची फेरमतदानाची मागणी फेटाळली आहे. मारकडवाडीतल्या ग्रामपंचायतीने मतदान प्रक्रियेची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा फेरमतदानाच्या मागणीचा ठराव निवडणूक निर्...