December 5, 2024 9:25 AM

views 35

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. युनायटेड स्टेट्स माहिती सेवेतून त्यांनी मुंबईत अमेरिकी दूतावासात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बीडच्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पाटोदेक...

December 5, 2024 9:21 AM

views 62

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांचं कीर्तन, अभंगवाणी, संगीत रजनी तसंच भजनासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

December 5, 2024 9:18 AM

views 37

समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनर अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या दोघांचा मृत्यू

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथं कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या बहुजन समाज पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून बसपाची समिक्षा बैठक आटोपून ते परतत असताना काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन बनसोडे आणि प्रशांत निकाळजे अशी ...

December 5, 2024 10:44 AM

views 40

सागरी व्यापार संरक्षित करून भारतीय नौदल देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील-राष्ट्रपतींचा विश्वास

भारतीय नौदल नेहेमीच देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करत राहणार असून, 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्यासाठी आपलं सहकार्य आणि योगदान देत राहील असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. ओडिशातील पुरी येथील ब्लू फ्लॅग बीचवर नौदल दिनाच्या समारंभात त्या बोलत होत्या. सागरी व्यापार संरक्षित ...

December 5, 2024 8:26 AM

views 480

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे. भाजपाच्या गा...

December 4, 2024 8:17 PM

views 73

क्रिकेट : १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारताचा विजय

क्रिकेटमध्ये १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर दहा गडी राखून विजय मिळवला. यूएईच्या  १३८ धावांचं आव्हान भारतानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं. आयुष म्हात्रेनं ६७ तर वैभव सूर्यवंशीने ७६ धावा करत भारताच्या  विजयावर शिक्कामोर्तब केलं.  त्याआधी संयुक्त अरब अमिरातीनं  नाणेफेक जिं...

December 4, 2024 8:14 PM

views 158

झारखंड सरकारच्या विस्तारित मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा उद्या शपथविधी

झारखंडमधे हेमंत सोरेन सरकारच्या विस्तारित मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी उद्या दुपारी रांची इथं होणार आहे. यावेळी ११ जणांना राज्यपाल संतोषकुमार गंगवार पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे -४,  काँग्रेसचे-४, तर राष्ट्रीय जनतादलाच्या एका मंत्र्याचा समावेश असेल. 

December 4, 2024 8:11 PM

views 35

पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची कुवैतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांच्याशी चर्चा

पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत कुवैतचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्लाह अली अल याह्या यांच्याशी चर्चा केली. भारत कुवैतबरोबर ऊर्जा, गुंतवणूक,  माहिती आणि तंत्रज्ञान, व्यापार आदी क्षेत्रांमधले द्विपक्षीय संबंध  दृढ  करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं जयशंकर  या चर्चेदरम्यान म्हणा...

December 4, 2024 8:05 PM

views 51

दक्षिण कोरियामधे अध्यक्ष यून सुक योल यांच्यावर महाभियोग चालवण्याचा विरोधी पक्षांचा संसदेत प्रस्ताव

दक्षिण कोरियामधे अध्यक्ष यून सुक योल यांच्यावर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षसदस्यांनी संसदेत मांडला आहे. यून सुक योल यांनी काल अचानकपणे लष्करी राजवट लागू केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. हजारो नागरिक निदर्शनं करीत रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे अवघ्या ६ तासात यून यांनी...

December 4, 2024 8:03 PM

views 8

भारतनेट प्रकल्पाअंतर्गत २ लाख १४ हजार ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी दिली – राज्यमंत्री डॉ. पेमासानी चंद्रशेखर

भारतनेट प्रकल्पाअंतर्गत सरकारनं आत्तापर्यंत देशभरातल्या दोन लाख १४ हजार ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी दिली असल्याचं, दळणवळण राज्यमंत्री डॉ. पेमासानी चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. भारतनेट प्रकल्पांतर्गत आदिवासी भागांसह सरकार  सर्व ग्रामपंचायती आणि गावांना ...