December 7, 2024 11:22 AM

views 34

वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना सीरियाचा प्रवास टाळण्याचा दिला सल्ला

पश्चिम आशियाई देशातली सद्यस्थिती लक्षात घेता, पुढील सूचना मिळेपर्यंत भारतीय नागरिकांनी सीरियाचा प्रवास टाळण्याचा तसंच शक्य असल्यास सिरियातून बाहेर पडण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला असून, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

December 7, 2024 11:15 AM

views 56

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल – केंद्रीय कृषी मंत्री

केंद्रसरकार, शेतकऱ्यांना येणाऱ्या उत्पादन खर्चाच्या 50 टक्क्यांहून अधिक किमान आधारभूत किंमत निश्चित करून शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करेल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल दिलं. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना चौहान बोलत होते. शेतमालाला किफायतशीर भाव मिळावा यास...

December 7, 2024 11:06 AM

views 40

रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर

रिझर्व्ह बँकेनं काल आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. यात रेपो रेट साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सलग अकराव्यांदा प्रमुख व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय रिझर्व बँकेनं घेतला आहे. यामुळे स्थायी ठेव सुविधा दर सव्वा सहा टक्के तर किरकोळ स्थायी सुविधा दर आणि बँक दर पावणे सात टक्के कायम राहणार आ...

December 7, 2024 11:04 AM

views 55

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग-राष्ट्रपतींचं प्रतिपादन

मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओडीशातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलं. केवळ 'रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण' हे ब्रीद न ठेवता, विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून...

December 7, 2024 8:01 PM

views 28

अहमदाबाद इथं बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित  बीएपीएस कार्यकर्ता सुवर्ण महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीमार्फत संबोधित केलं. रशिया युक्रेन युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित मायदेशी परतण्यात बीएपीएस च्या कार्यकर्त्यानी केलेल्या मदतीची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली. भारताच्या ‘एक पेड माँ के नाम’...

December 7, 2024 10:40 AM

views 26

चंपाषष्ठीचा सोहळा आज होतोय साजरा

चंपाषष्ठीचा सोहळा आज साजरा होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीसह, छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या सातारा आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या खंडोबा मंदिरात आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खंडोबाच्या षड्रारोत्सवाचंही आज उत्थापन होत आहे.

December 7, 2024 10:26 AM

views 35

लातूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जिल्ह्यातील ५१ शाळांमधील जवळपास ६०० दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दिव्यांगत्व प्रकार आणि वयोगटानुसार ९२ विविध गटात या स्पर्धा होणार असल्याचं, ...

December 7, 2024 10:16 AM

views 31

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर आज राजूरमध्ये अंत्यसंस्कार

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. गेल्या 15 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज राजूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील. म...

December 7, 2024 10:09 AM

views 38

देशभरात नवीन 85 केंद्रीय विद्यालयं होणार सुरु , महाराष्ट्रातील तीन ठिकाणांचा समावेश

केंद्रीय आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीनं देशभरात नागरी तसंच संरक्षण क्षेत्रांतर्गत 85 नवीन केंद्रीय विद्यालयं उघडण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अकोला, पुण्यातील एनडीआरएफ परिसर, सुदुंबरे आणि रत्नागिरीतील नाचणे भागात प्रत्येकी एक अशा तीन विद्यालयांचा समावेश आहे. 85 नवीन केंद्रीय व...

December 7, 2024 9:47 AM

views 42

बीड युवा महोत्सवाचा शुक्रवारी झाला समारोप

बीड युवा महोत्सवाचा काल समारोप झाला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप समारंभात, विविध स्पर्धांमधल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. युवकांना अशा महोत्सवातून प्रोत्साहन मिळतं, यातूनच देशाचे भविष्य घडण्यासही मदत होते, असं मत स्वामी यांनी व्यक्त ...