December 8, 2024 8:47 PM

views 34

U१९ आशिया चषक : भारताचा ५९ धावांनी पराभव होऊन बांग्लादेश विजयी

दुबई इथं झालेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ५९ धावांनी पराभव करून बांग्लादेशानं विजेतेपद पटकावलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांग्लादेशाच्या गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण संघ ३५ षटकं आणि दोन...

December 8, 2024 7:17 PM

views 29

राज्यपाल पदाचं आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक करणाऱ्याला अटक

कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निरंजन कुलकर्णी असं या आरोपीचं नाव आहे. निरंजन याने तामिळनाडूमधल्या एका व्यक्तिला आपली राजकीय वर्तुळात ओळख असल्याचं भासवत कोणत्याही राज्याचं राज्यपाल पद मिळवून देण्याचं आमिष दा...

December 8, 2024 7:14 PM

views 115

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प संगमनेर मार्गावरच होणार

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्याच प्रस्तावित संगमनेर मार्गावरच होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं आहे. हा प्रलंबित प्रकल्प प्रस्तावित संगमनेर मार्गावरच व्हावा या मागणीसाठी  खासदार राजाभाऊ वाजे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत अश्विनी वैष्णव य...

December 8, 2024 7:00 PM

views 32

१२वी वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

१२ वी वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा आज झाली. देशातल्या सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकंदर ५८ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.         ऑलिम्पिक पदकविजेती पैलवान साक्षी मलिक या मॅरेथॉनची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून उपस्थित होत...

December 8, 2024 6:22 PM

views 27

सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर जिल्ह्यात तरवडी इथल्या सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आज अहिल्यानगर इथं ही माहिती दिली.  राधेशाम जाधव यांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला असून साहित्य प...

December 8, 2024 3:41 PM

views 39

U१९ आशिया चषक : अंतिम सामन्यात बांग्लादेशाचं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी देखील बांग्लादेशाच्या फलंदाजीला लगाम घालत, त्यांचा संपूर्ण...

December 8, 2024 3:23 PM

views 60

निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत फेरफार – पृथ्वीराज चव्हाण

राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार निवडणूक आयोग स्‍वायत्त संस्‍था आहे, मात्र निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरफार केले. अप्रत्‍यक्षपणे सरकारच आयुक्तांची नेमणूक करीत असून त्यामुळे आयोग सरकारला अपेक्षितच काम करतो, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी के...

December 8, 2024 7:04 PM

views 74

‘मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ग्रामस्थांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचं कारण नाही’

मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्‍...

December 8, 2024 7:02 PM

views 35

विरोधकांचा शपथविधीवरचा बहिष्कार मागे, आतापर्यंत २८० सदस्यांचा शपथविधी

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी १०६ नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. काल १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराला निषेध म्हणून काल ...

December 8, 2024 3:44 PM

views 34

देशाच्या सीमा संरक्षणाला मजबुती देण्याचं काम सीमा सुरक्षा दल करत असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

सीमा सुरक्षादल गेली ६ दशकं देशाच्या सीमा सुरक्षेला मजबुती देण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केलं. ते आज जोधपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सीमा सुरक्षा दलाच्या योगदानाशिवाय देशासमोरच्या सुरक्षा आ...