December 9, 2024 4:46 PM

views 108

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर झाले असल्याचं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या निधीतून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कुटुंब...

December 9, 2024 4:11 PM

views 36

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचं पुनरागमन

गेले काही दिवस उकाडा जाणवत असताना कालपासून राज्यात थंडीचं पुनरागमन झालं आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान तयार होऊन अवकाळी पाऊस पडला तसंच  तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे  मुंबईसह नाशिक, पुणे इत्यादी भागात थंडीचा जोर  वाढला आहे....

December 9, 2024 3:52 PM

views 57

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याविरोधात...

December 9, 2024 3:44 PM

views 44

राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता, तो सभागृहाने आवाजी मतदानान...

December 9, 2024 8:17 PM

views 56

रशियात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आयएनएस तुशील भारतीय नौदलात दाखल

बहुउद्देशीय क्षेपणास्त्रवाहू जहाज आय एन एस तुशील चा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आज भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. रशियाच्या यंतार बंदरात झालेल्या या समारंभात भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. आय एन एस तुशील, ब्राम्होससह अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असू...

December 9, 2024 1:39 PM

views 35

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष स्टीफन मरांडी यांनी सदस्यांना शपथ द्यायला सुरुवात केली आहे. शपथग्रहण संपल्यावर उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल,त्यानंतर हेमंत सोरेन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जाईल, बुधवारी राज्यपालांच अभिभाषण...

December 9, 2024 1:29 PM

views 53

देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज देशविरोधी शक्तींचा एकजुटीनं सामना करण्याचं आवाहन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्येक मुद्दा राजकीय भिंगातून बघितला जाऊ नये, असं ते म्हणाले. जॉर्ज सोरोस फाऊंडेशन आणि एका ज्येष्ठ  विरोधी नेत्याचे संबंध...

December 9, 2024 1:23 PM

views 11

तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरूणांच्या कौशल्यविकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते संबोधित करत होते. सध्या भारत तंत्रज्ञान आ...

December 9, 2024 10:04 AM

views 33

विश्व बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याची ११व्या फेरीत आघाडी

फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश यानं ६-५ अशी आघाडी मिळवली आहे. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ११ व्या फेरीत काल गुकेशनं गतविजेत्या डिंग लिरेनवर मात केली. या विजयामुळे गुकेशनं सामने बरोबरीत राहण्याची मालिका खंडीत केली असून त्याच्या जगज्जेतेपदाची शक्यता आणखी वाढ...

December 9, 2024 1:54 PM

views 26

कनिष्ठ महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

ओमानमध्ये मस्कत इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतीय संघानं बांग्लादेशवर १३-१ असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे मुमताज खान हिनं 4 तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी ३ गोल केले. आज गट साखळीतला भारताचा दुसरा सामना मलेशियासोबत होणार आहे. ही स्पर्धा पुढच्या...