January 4, 2025 1:43 PM

views 49

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला तसंच ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाचं उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. वर्ष २०१४ पासून...

January 4, 2025 1:40 PM

views 44

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३ – २४ या आर्थिक वर्षात ५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचा भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात निष्कर्ष

देशाच्या ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण २०२३-२४ या आर्थिक वर्षात जवळपास ५ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. हे प्रमाण २०११-२०१२ या आर्थिक वर्षात जवळपास २७ टक्के इतकं होतं. भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये शहरी भागातलं दारिद्र्याचं प्रमाणही १३ पूर्णांक ७ श...

January 4, 2025 1:36 PM

views 48

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर ४ धावांची माफक आघाडी, मात्र दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी पुन्हा गडगडली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या, सिडनी इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात, भारतानं दुसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात ६ बाद १४१ धावा केल्या आहेत. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ १८१ धावांत गुं...

January 4, 2025 1:35 PM

views 61

उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणात रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू असून प्रवाशांना दाट धुक्यातून मार्ग काढावा लागत आहे. कमी दृश्यमानतेमुळे रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला असून दिल्लीकडे जाणाऱ्या ४९ गाड्या चार तास विलंबानं...

January 4, 2025 11:43 AM

views 42

शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक म...

January 4, 2025 11:42 AM

views 29

कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त

कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद ...

January 4, 2025 11:39 AM

views 58

जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक

जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं असून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक ...

January 4, 2025 10:12 AM

views 17

लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात Know Your Army मेळाव्याचं आयोजन

भारतीय सेना ही जगातील सर्वोत्तम सेनांपैकी एक सेना आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला सेना परतवून लावू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. 15 जानेवारी रोजी पुण्यात साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर Know Your Army मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते. ...

January 4, 2025 10:10 AM

views 51

अमेरिकेत माइक जॉन्सन यांची काठावरच्या मतांनी सभापतिपदी फेरनिवड

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा पाठिंबा असलेले माइक जॉन्सन यांची संसदेत सभापती म्हणून फेरनिवड झाली आहे. तीन रिपब्लिकन सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध मतदान केलं होतं, मात्र ऐन वेळी त्यांनी त्यांचं मत बदलल्यामुळे जॉन्सन यांची निवड होऊ शकली. जॉन्सन यांना 218, तर डेमोक्रॅट पक्षाचे हकीम जेफ्रीस यांना 215 मतं मि...

January 3, 2025 8:35 PM

views 53

चीनमध्ये आढळलेल्या HMPV व्हायरसमुळे चितेंचं कारण नाही

चीनमध्ये आढळून आलेल्या HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसमुळं चिंता करण्याची गरज नाही. श्वसनाच्या इतर आजारांना कारणीभूत असलेल्या विषाणूंसारखा हा विषाणू आहे असं केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक अतुल गोयल यांनी म्हटलं आहे. यामुळं प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये फ्लू ...