January 6, 2025 10:00 AM

views 41

बीड हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणातल्या पाच आरोपींना पकडण्यात आलं असून, हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

January 5, 2025 8:16 PM

views 20

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्य...

January 5, 2025 8:07 PM

views 69

उपराष्ट्रपतींची राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट

नागरिकाची राष्ट्रवादाशी घट्ट बांधिलकी असल्याशिवाय कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिल्यानंतर बोलत होते.    भारताच्या विकासाकरता नागरिकांचा राष्ट्रवाद आणि संघटन तसंच राष...

January 5, 2025 8:17 PM

views 36

विश्वासार्हता हेच सहकारी संस्थांचे भांडवल – नितीन गडकरी

महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात मानेवाडा इथं गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते. सहकार क्षेत्रातल्या संस्थांसाठी विश्वासार्हता आण...

January 5, 2025 8:02 PM

views 47

सीमा उल्लंघनप्रकरणी भारतीय आणि बांगलादेशी मच्छीमारांची सुटका

आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशाच्या ताब्यात असलेल्या ९५ भारतीय मच्छीमारांची आज भारतानं सुटका केली, तर भारतानंही आपल्या ताब्यात असलेल्या ९० बांगलादेशी मच्छीमारांची सुटका केली. बंगालच्या उपसागरातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर आज संध्याकाळी ही प्रक्रिया पार पडली. मुक्त झालेल...

January 5, 2025 8:32 PM

views 44

भारतीय सेनेच्या वरूण तोमरला १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अजिंक्यपद

नवी दिल्ली इथंल्या डॉ. करणी सिंह शूटिंग रेंजमध्ये पार पडलेल्या  ६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आज भारतीय सेनेच्या वरूण तोमरनं आज १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातलं राष्टीय नेमबाजी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं असून  वरूणचा संघ सहकारी प्रद्युम्न सिंह ह्यानं रौप्य तर राजस्थानच्या आकाश भारद्वाजनं  कांस्य...

January 5, 2025 7:47 PM

views 15

केंद्रीय पोलाद मंत्र्यांच्या हस्ते उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना वन पॉईंट वनचा प्रारंभ

केंद्रीय पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी उद्या नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं पोलाद उद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना वन पॉईंट वन चा प्रारंभ करतील. या योजनेमुळे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, तसंच १४ हजारांपेक्षा जास्त रोजगारही निर्माण झाले आहेत असं पोलाद मंत्रालयानं म्हटलं आहे.

January 5, 2025 7:44 PM

views 41

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष...

January 5, 2025 7:42 PM

views 42

गुजरातमधे झालेल्या हेलिकॉप्टरअपघातात तिघांचा मृत्यू

भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आज गुजरात मधल्या पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात दोन वैमानिक आणि एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर आपला नियमित सराव करत असताना ही दुर्घटना घडली, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरु झाल्याचं तटरक्षक दलानं सांगितलं.

January 5, 2025 7:40 PM

views 29

पॅरासिटामोलची निर्मिती करण्यासाठी स्वदेशी तत्रंज्ञान विकसित

सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं पॅरासिटामोल या वेदनाशामक आणि तापावरच्या गुणकारी औषधाची निर्मिती करण्यासाठी एक स्वदेशी तत्रंज्ञान विकसित केलं आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. ते आज सीएसआयआर च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार...