January 6, 2025 8:04 PM

views 42

रस्ता सुरक्षेत अधिकाऱ्यांनी तडजोड न करता अंमलबजावणी करावी- नितेश राणे

रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी तडजोड न करता अंमलबजावणी केली तरच रस्ता अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होईल असं, मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश  राणे यांनी म्हटलं आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस  इथं  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय  कार्यालयात रस्ता सुरक्षा अभियान २०...

January 6, 2025 8:02 PM

views 52

मनोज जरांगे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून जरांगे यांच्या विरोधात बीड, अंबाजोगाई, किल्ले धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्या निषेधात केज पोलीस ठाण्यात ओबीसी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन के...

January 6, 2025 8:00 PM

views 53

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताकडून निषेध

पाकिस्तानने अफगाणिस्तानमधे नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी  आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेल्याच्या वृत्तांची दखल भारत सरकारने घेतली असून विश...

January 6, 2025 8:51 PM

views 43

चांदीसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना – प्रल्हाद जोशी

ग्राहकांच्या मागणीनंतर चांदी आणि चांदीच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला केली आहे. नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   भारतीय मानक ब्युरोन...

January 6, 2025 7:51 PM

views 57

भायखळा-बोरिवलीत बांधकामावरचे निर्बंध शिथील-BMC

मुंबई महानगरातल्या हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारल्यामुळे भायखळा आणि बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामावर लावलेली सरसकट बंदी हटवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली.   प्रदूषण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी हे निर्बंध लादायचा निर्णय महानगरपालिकेनं ...

January 6, 2025 7:49 PM

views 43

विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं- नितीन गडकरी

स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही रस्ते सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत 'रस्ते सुरक्षा अभियान २०२५'च्या 'सुरक्षा रिलोडेड' कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. दुदैवानं गेल्या ...

January 6, 2025 7:47 PM

views 29

विशेष स्वरुपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ-एचडी कुमारस्वामी

केंद्र सरकारनं स्टील उद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आज सुरू केली. विशेष स्वरुपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ आहे. उच्च दर्जाच्या स्टीलला असलेली मागणी, आयात कमी करायला आणि आत्मनिर्भर भारतासाठी योग्य संधी असल्याचं केंद्रीय स्टील आणि अवजड़ उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले. ...

January 6, 2025 7:42 PM

views 71

HMPV संसर्गाचा शेअर बाजारातही मोठा परिणाम

देशात HMPV विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्याचा विपरीत परिणाम देशातल्या शेअर बाजारांवरही आज झाला आणि दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात आपटले. सेन्सेक्स १ हजार २५८ अंकांनी घसरुन ७७ हजार ९६५ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३८९ अंकांनी घसरुन २३ हजार ६१६ अंकांवर स्थिरावला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या समभ...

January 6, 2025 6:26 PM

views 53

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात HMPV बाधित कोणताही रूग्ण नाही

मुंबई शहर आणि उपनगरात एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे. नागरिकांनी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांनी श्व...

January 6, 2025 4:06 PM

views 30

पालघर जिल्ह्यात डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्यात डहाणू, दापचरी परिसरात आज पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. डहाणू आणि दापचरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के बसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.