January 7, 2025 10:22 AM

views 63

बीड शहरात काढण्यात आला संविधान बचाव मोर्चा

बीड शहरात काल संविधान बचाव मोर्चा काढण्यात आला. परभणी इथल्या घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातही यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.  

January 7, 2025 9:14 AM

views 34

तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या महोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा ११ जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात देव...

January 7, 2025 9:13 AM

views 55

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन सादर

बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा सम...

January 7, 2025 9:07 AM

views 53

देशभरात आतापर्यंत पाच अर्भकांना एचएमपीव्ही विषाणूची लागण

देशात पाच रुग्णांना एच एम पी व्ही या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये कर्नाटकात तीन आणि आठ महिन्यांच्या अर्भकांना, गुजरातमध्ये अहमदाबाद इथं दोन महिन्याच्या बालकाला, तर तामिळनाडूमध्ये चेन्नई आणि सालेम इथं या विषाणूचे रुग्ण सापडले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.   कर्नाटकात आढळलेल्या तीन...

January 7, 2025 8:53 AM

views 53

लातूर येथे सुरू असलेल्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप

लातूर इथं सुरू असलेल्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. या चार दिवसीय स्पर्धांमध्ये हॉकी तसंच जलतरण आदी स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.

January 7, 2025 8:59 AM

views 45

रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल -प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन काल मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध चार निकषांच्या आधारावर रेल्वेचा विक...

January 7, 2025 11:28 AM

views 40

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंग स्फोटात आठ सैनिकांना वीरमरण

छत्तीसगड मधल्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरंगाच्या स्फोटात आठ सुरक्षा सैनिक आणि चालक ठार झाले. पंधरा जणांच्या जिल्हा राखीव रक्षक दलाची तुकडी, संयुक्त कारवाईनंतर काल दंतेवाडा इथून वाहनानं परतत असताना कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट केला. स्फोटानंतर नक्षलवा...

January 6, 2025 8:48 PM

views 25

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे. विष्णू चाटे याची पोलीस कोठडीत चार दिवसांची तर जयराम चाटे, महेश केदार, आणि प्रतीक घुले याची पोलीस कोठडी न्यायालयानं १२ दिवसांनी वाढवली.

January 6, 2025 8:46 PM

views 15

राज्य लोकायुक्त कार्यालयाची २०२३ मधे ४ हजार ५५५ प्रकरणं निकाली

राज्याच्या लोकायुक्त कार्यालयानं २०२३ मधे ४ हजार ५५५ प्रकरणं निकाली काढली, तर वर्षअखेर ४ हजार ८१८ प्रकरणं प्रलंबित राहिली.  राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे, आणि उप लोकआयुक्त संजय भाटिया यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा ५१ वा वार्षिक एकत्रित अहवाल  सादर...

January 6, 2025 8:46 PM

views 36

खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांनी प्रयत्नांना अधिक गती द्यावी- शिवराजसिंग चौहान

खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णतेचं उद्धिष्टं गाठण्यासाठी राष्ट्रीय  खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांना प्रयत्नांना अधिक गती द्यावी, असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत, याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याच्य...