January 7, 2025 7:08 PM

views 26

नेपाळ-तिबेट सीमा भागात झालेल्या भूकंपात ९५ जण मृत्यू, तर १३० जण जखमी

नेपाळ-तिबेट सीमा भागात आज सकाळी झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या ९५  वर पोहोचली आहे, तर १३० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेट मधल्या  झिझांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.    बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या...

January 7, 2025 7:06 PM

views 38

‘भारतपोल’ आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील-अमित शाह

‘भारतपोल’ पोर्टल आणि तीन नवीन फौजदारी कायदे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मजबूत यंत्रणा म्हणून काम करतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.  ते आज नवी दिल्ली इथं सीबीआयनं विकसित केलेल्या ‘भारतपोल’ पोर्टलचं उदघाटन करताना बोलत होते. हे पोर्टल तपास यंत्रणा आणि सर्व राज...

January 7, 2025 7:02 PM

views 37

गडचिरोली ठाकूरदेव यात्रेत जल, जंगल, जमिनीचे संवर्धन करण्याचा नागरिकांचा संकल्प

गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड इथल्या ठाकूरदेव यात्रेत आसपासच्या ७० गावातल्या  नागरिकांनी जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन करण्याचा संकल्प सोडला. दरवर्षी ५ ते ७ जानेवारी असे तीन दिवस ही यात्रा भरते. यंदाच्या यात्रेतही हजारो आबालवृद्ध सहभागी झाले होते. घटस्थापना झाल्यानंतर ठाकूरदेवाची ...

January 7, 2025 7:01 PM

views 32

बांबू  बायोमास खरेदी करण्यासाठी पन्नास वर्षांचे करार केले जातील-गुरदीप सिंग

बायोमासवर आधारित ऊर्जा प्रकल्प  ही पर्यावरण संवर्धनासाठी काळाची गरज असून शेतकरी उत्पादक संघटनांशी बांबू  बायोमास खरेदी करण्यासाठी पन्नास वर्षांचे करार केले जातील असं राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष गुरदीप सिंग यांनी म्हटलं आहे. धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरेदी ध...

January 7, 2025 7:00 PM

views 20

एडापड्डी पलानीसामी यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि  अण्णाद्रमुक पक्षाचे महासचिव एडापड्डी पलानीसामी यांच्या मालकीच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज छापे टाकले आहेत. चेन्नई, इरोड, कोईम्बतूर आणि बंगळुरूमधल्या २५ ठिकाणांवर हे छापे अजूनही सुरु आहेत.

January 7, 2025 7:00 PM

views 12

डेटा सुरक्षा नियमच्या मसुद्यामुळे भारताची नागरिक केंद्री सुशासनाप्रती वचनबद्धता अधोरेखित-प्रधानमंत्री

डिजिटल वैयक्तिक डेटा सुरक्षा नियम २०२५ च्या मसुद्यामुळे भारताची नागरिक केंद्री सुशासनाप्रती वचनबद्धता अधोरेखित होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेल्या पोस्टला ते उत्तर देत होते. या नियमावलीमुळे केवळ वैयक्तिक डेट...

January 7, 2025 6:50 PM

views 30

भारत आणि मलेशिया देशांमधल्या सुरक्षा सहकार्य बळकट करण्यासाठी संमती

भारत आणि मलेशिया ने दहशतवादाचा आणि मूलतत्त्ववादाचा सामना  करण्यासाठी तसंच सायबर सुरक्षा, संरक्षणविषयक उद्योगांच्या आणि सागरी सुरक्षेच्या विषयात सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी संमती दर्शवली आहे. नवी दिल्लीत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मलेशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे महासंचाल...

January 7, 2025 4:55 PM

views 43

एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे – मंत्री हसन मुश्रीफ

एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, लहान मुलं , वृद्ध तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात एच एम पी व्ही विषाणूसंदर्भात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्...

January 7, 2025 4:50 PM

views 39

भाजपाचं राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट

नवीन सदस्यनोंदणी अभियानात दीड कोटी प्राथमिक तर ५ लाख सक्रीय सदस्य मिळवण्याचं प्रदेश भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मुंबईत आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. येत्या १० जानेवारीला घर चलो अभियान सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहिल्यानगर इथं ...

January 7, 2025 4:41 PM

views 13

दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक घेतली. हा वार्षिक मेळावा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातला समन्वय वाढवण्यासाठी महत्वाच्या धोरणात्मक बाबींवर सहयोगी चर्चा करण्यासाठी आणि देशाच्...