January 31, 2025 7:51 PM

views 47

तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला पुण्यात प्रारंभ

कृत्रिम बुध्दिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला न घाबरता त्या तंत्रज्ञानाचा उपयोग मराठी भाषेचा विकास आणि समृद्धीसाठी कसा करता येईल, यादृष्टीने विचार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत...

January 31, 2025 7:51 PM

views 54

U19 World Cup : महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत

१९ वर्षाखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित केलं आहे. आज क्वालालंपूर इथं झालेल्या  उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं,  इंग्लंडवर ९ गडी राखून मात केली.    प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं २० षटकात ८ गडी गमावून ११३ धावा केल्या. भारतातर्फे परुनिका सिसोदिया, आणि...

January 31, 2025 3:50 PM

views 55

बीएसएनएलच्या ‘बल्क पुश एसएमएस ए टू पी’ सेवेचं उद्घाटन

मोबाईल फोनवर बँकांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठवता येतील अशा सुरक्षित सेवेचं व्यासपीठ बीएसएनएलने उपलब्ध करुन दिलं आहे.  बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी यांच्या हस्ते या बल्क पुश एसएमएस ए टू पी सेवेचं उद्घाटन काल मुंबईत झालं. बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध ...

January 31, 2025 3:48 PM

views 56

अकोल्यात जीबीएसचे ४ रुग्ण

पुण्यात आढळून आलेल्या जीबीएस अर्थात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आता अकोल्यातही आढळून आले आहेत. अकोल्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमच्या ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून उपचार घेणाऱ्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं...

January 31, 2025 3:42 PM

views 51

T20 क्रिकेट : पुण्यात भारत आणि इंग्लड यांच्यात मालिकेतला चौथा सामना

भारत आणि इंग्लड यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज पुण्यात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. मालिकेत याआधी झालेल्या तीन सामन्यांपैकी भारतानं दोन तर इंग्लंडनं एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा, तर...

January 31, 2025 3:20 PM

views 28

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं आज सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा  प्रारंभ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सुरु झालं.    लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देशाच्या विकासात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसंच मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि ३ ...

January 31, 2025 3:52 PM

views 42

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला २५ पदकांची कमाई

उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक २५ पदकांची कमाई केली आहे. यात ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आज झालेल्या स्पर्धांमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्...

January 31, 2025 3:12 PM

views 41

प्रयागराज दुर्घटना : न्यायलयीन आयोगाची संगम घाटाला भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला न्यायालयीन आयोग आज संगम घाटाला भेट देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा त्रिसदस्यीय आयोग राज्यसरकारने स्थापन केला आहे. उत्तरप्रदेशच...

January 31, 2025 2:46 PM

views 36

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशात प्रथमच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या म...

January 31, 2025 3:14 PM

views 41

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांकडून प्रेरणा घेऊन  सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेश...