February 6, 2025 10:32 AM

views 44

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ईशान्य भारत आता विकासाच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते काल त्रिपुरा सरकारमधील 2800 हून अधिक नोकरीच्या नियुक्ती पत्रांच्या वितरण कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. गेल्या 10 वर्षात केंद...

February 6, 2025 10:30 AM

views 63

प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्याकडून दु:ख व्यक्त

लाखो इस्माईली मुस्लिमांचे नेते प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांचं मंगळवारी पोर्तुगालमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. प्रिन्स करीम आगा खान हे एक दूरदर्शी इमाम होते ज्यांनी आपले जीवन सेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केले. आ...

February 6, 2025 10:24 AM

views 42

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन वायुदलाचं विमान काल अमृतसरमध्ये पोहोचलं. यामधील 30 जण पंजाबमधील असून इतर चंदिगड, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. कोणतेही अधिकृत कागदपत्र नसलेल्या या प्रवाशांची चौकशी आणि ओळखपरेड सध्या सुरु आहे. अमृतसरमधील अध...

February 6, 2025 9:55 AM

views 45

परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांनी SCOच्या नवनियुक्त मुख्य सचिवांची नवी दिल्लीत घेतली भेट

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल शांघाय सहकार्य परिषदेचे अर्थात SCOचे नवनियुक्त मुख्य सचिव नुरलन इरमेमेकबाव यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारताचं शांघाय परिषदेतील काम आणि सुरक्षित SCO कसं असावं याविषयावर यावेळी चर्चा झाली, अस...

February 6, 2025 9:50 AM

views 24

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या चार नदीजोड प्रकल्पांचं काम येत्या वर्षभरात सुरू करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या खुंटेफळ इथं आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाचं भूमिपूजन करताना ते काल बोलत होते.

February 6, 2025 9:47 AM

views 47

ढाका येथे संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले बंगबंधू स्मारक संग्रहालय

बांग्लादेशमध्ये, राजधानी ढाका इथं बंगबंधू स्मारक संग्रहालय काल रात्री संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले. धनमोंडी हे संग्रहालय बांग्लादेशचे संस्थापक राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान शेख हसीनाचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचे वैयक्तिक निवासस्थान होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी रात्री 9 वाजता त्यांच्या पक...

February 6, 2025 9:06 AM

views 38

प्रयागराज येथील महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आज जनजाती सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये देशभरातील पंधरा हजारांहून आधिक आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आदिवासी समाजासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध राज्यातील 25 तरुणांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसंच आदिवासी संस्कृतीश...

February 5, 2025 8:21 PM

views 44

जागतिक पातळीवर एआयच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखणार – मंत्री अश्विनी वैष्णव

जागतिक पातळीवर एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांची नवी दिल्लीत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एआय संदर्भातल...

February 5, 2025 8:18 PM

views 60

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांन...

February 5, 2025 8:16 PM

views 43

दिल्ली विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत आणि मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि दिल्लीचे मंत्री गोपाल राय, भाजपचे विजेंदर गुप्ता, प...