February 6, 2025 2:14 PM

views 31

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे दिले आदेश

USAID, अर्थात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेनं आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संस्थेचं राज्य विभागाबरोबर विलीनीकरण करण्याचे आदेश दिल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला. परदेशात कार्यरत असलेल्या ...

February 6, 2025 1:55 PM

views 44

अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढीलं दोन दिवस पडणार जोरदार पाऊस – हवामान विभाग

ईशान्य भारतात अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढले दोन दिवस जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्यप्रदेशात राजधानी भोपळसह इतर भागात थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे, तरी पुढले काही दिवस सकाळ आणि रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होईल असा अंदाज आहे. राजस्थानमध्ये गेले काही दिवस...

February 6, 2025 1:53 PM

views 49

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८५ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८५ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत मात्र महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. पहिल्या स्थानावर कर्नाटक, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा आणि तिसऱ...

February 6, 2025 4:16 PM

views 42

अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच काँग्रेस, समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी अमेरिकेतूून भारतीय नागरिका...

February 6, 2025 1:40 PM

views 42

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावरील चर्चेला प्रधानमंत्री आज राज्यसभेत उत्तर देणार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देतील. आज संध्याकाळी मोदी सभागृहाला संबोधित करतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभारप्रस्ताव मंजूर झाला होता.

February 6, 2025 1:37 PM

views 44

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकंदर ६० पूर्णांक ४२ टक्के मतदानाची नोंद

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी काल शांततेत मतदान झालं. एकूण ६० पूर्णांक ४२ शतांश टक्के मतदान झालं असून सर्वाधिक ६४ टक्के मतदान ईशान्य दिल्लीत झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. तर अग्नेय दिल्ली मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री आतिशी, मनिष सिसो...

February 6, 2025 1:29 PM

views 78

महाराष्ट्रात यापुढं औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी बिगरशेती परवानगी बंधनकारक नाही

राज्यात यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी एन. ए. म्हणजेच बिगरशेती परवानगी बंधनकारक नसेल. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल केला जाईल. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या ‘व्यापार सुलभता’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं महसूल वि...

February 6, 2025 11:43 AM

views 38

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज खेळला जाणार तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातला तीन 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी ओडिशामधल्या कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा 50 षटकांचा सामना 12 फेब्रुवारील...

February 7, 2025 12:49 PM

views 41

मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उदघाटन

विविध विषयांतील माहिती आणि ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदावावी, असं आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलं. मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं उद्घाटन काल डॉक्टर गोऱ्हे आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. केवळ मोबाईलवर गुंत...

February 6, 2025 11:23 AM

views 39

घाटी रुग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलं. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतनाा ते बोलत होते. छत्रपती संभाज...