December 11, 2025 1:28 PM

views 21

राज्यसभेत आज वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा समारोप

वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्माणाचं आवाहन आहे, असं प्रतिपादन राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चर्चेचा समारोप करताना ते बोलत आहेत. या चर्चेत ८० पेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला असून स...

December 11, 2025 1:20 PM

views 67

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केली प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात

 अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदरात पाव टक्के कपात केली  असून, २०२२ साला नंतरचा हा नीचांकी स्तर आहे. व्याजदर पातळी ३ पूर्णांक ५ दशांश, ते ३ पूर्णांक ७५ शतांश टक्के, या टप्प्यात कायम राखण्याचं बँकेचं उद्दिष्ट आहे.   फेडरल रिझर्व्हनं सप्टेंबर महिन्यापासून सलग तिसऱ्यांदा व्य...

December 11, 2025 1:03 PM

views 26

 न्यायव्यवस्थेत एआय समितीची पुनर्रचना करायचा निर्णय

 न्यायव्यवस्थेत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एआय समितीची पुनर्रचना करायचा निर्णय सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी घेतला आहे.   पाच सदस्यांच्या या समितीचं नेतृत्व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्याकडे असेल. न्यायदानाच्या प्रक्रियेची कार्यक्षमता...

December 11, 2025 1:00 PM

views 23

गोवा नाइट क्लब आग प्रकरणातले लुथरा भावंडं थायलंड पोलिसांच्या ताब्यात

गोवा नाइट क्लब आग प्रकरणातले आरोपी आणि क्लबचे भागीदार सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांना थायलंड पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. गोव्यातल्या अरपोरा इथल्या क्लबमध्ये गेल्या शनिवारी आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते.   त्यांच्याविरुद्ध इंटरपोल ब्लू कॉर्...

December 11, 2025 12:11 PM

views 42

एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनी विजयी

चेन्नई इथं काल रात्री झालेल्या एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, गतविजेत्या जर्मनीनं निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूट-आऊटमध्ये स्पेनचा 3-2 असा पराभव करून आपलं आठवं विजेतेपद पटकावलं. त्यापूर्वी काल, यजमान भारतानं अर्जेंटिनावर 4-2 असा विजय मिळवून कास्यप...

December 11, 2025 10:48 AM

views 29

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्यामध्ये, राज्यातल्या विविध औपचारिक आणि विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.   आज त्या इम्फाळमध्ये दाखल होणार आहेत. राज्याच्या क्रीडा वारसाचे प्रतीक असलेल्या मापल कांगजेइबुंगला भेट देऊ पोलोचा सामना पाहातील. राष्ट्...

December 11, 2025 10:14 AM

views 26

प्रधानमंत्र्यांचा इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. या दरम्यान उभय देशांदरम्यान असलेल्या धोरणात्मक भागीदारीच्या सातत्यपूर्ण गतीविषयी समाधान व्यक्त करताना, परस्पर फायद्यासाठी हे संबंध आणखी भक्कम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला. दोन...

December 11, 2025 10:00 AM

views 42

भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक दहशतवादाच्या परिस्थितीबाबत चर्चा

भारत आणि मलेशियानं दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरोधात सहकार्य बळकट करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये, भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना तोंड देण्यासंदर्भात दिल्लीत झालेल्या तिसऱ्या...

December 11, 2025 9:50 AM

views 53

इंडिगोच्या गुरूग्राम कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथकाची स्थापना

गेल्या आठवड्यातील इंडिगो विमानाच्या उड्डाणांना विलंब आणि उड्डाणं रद्द होण्याच्या घटनांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गुरूग्राममधील इंडिगोच्या कॉर्पोरेट कार्यालयात विशेष देखरेख पथक स्थापन केले आहे. महासंचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार, विमान विलंब, उड्डाणे रद्द होणे यांमुळे प्रवाशांना होणारा...

December 11, 2025 10:20 AM

views 80

दुबार मतदारांविषयी सरकारच्या शोधणे, वगळणे आणि हद्दपार करणे धोरणाचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून पुनरूच्चार

लोकसभेत काल निवडणूक सुधारणा आणि मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवर गंभीर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, मतांसाठी अवैध स्थलांतरीतांचे संरक्षण केल्याचा आरोप केला. देशाचे प्रधानमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री ठरवण्याचा घुसखोरांना अधिकार नाही,असं त्यांनी...