July 2, 2025 3:14 PM

views 47

शेतकरी आत्महत्या संदर्भातल्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे विधानसभेत विरोधकांचा सभात्याग

शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतः जोताला जोडण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न याविषयावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला. या गंभीर स्थितीवर आताच चर्चा करण्याची मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली, ती अध्यक्षांनी नाकारली. सरकार ही चर्चेला तयार आहे...

July 2, 2025 3:10 PM

views 35

ओला, उबर यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची केंद्र सरकारची परवानगी

ओला, उबर, रॅपिडो यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. पूर्वी ही मर्यादा दीडपट होती. गर्दी नसलेल्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या किमान निम्मी रक्कम भाडे म्हणून या कंपन्यांना आकारता येईल. केंद्री रस्ते वाहतूक आणि...

July 2, 2025 3:07 PM

views 51

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करून आखावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलत होते. राज्याच्या विकासाची कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन नियोजित वेळेत दर्जेदार पणे प...

July 2, 2025 3:06 PM

views 46

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया या ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते प्रथम घाना इथं जाणार असून उभयपक्षी हिताच्या अनेक मुद्द्यांवर बैठकांबरोबरच ते तिथल्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. घानामधल्या भारतीय समुदायात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ...

July 2, 2025 3:05 PM

views 43

मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

राज्यात मौसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दक्षिण भारतातला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताकडे सरकत असल्यानं कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात सतर्...

July 2, 2025 3:03 PM

views 39

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना झाली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पहाटे भगवती नगर इथं यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवला. या तीर्थयात्रेसाठी एकूण ५ हजार ८९२ यात्रेकरू रवाना झाले आहेत. २ हजार ४८७ यात्रेकरु बालताल मार्गाने तर ३ हजार ४०३ यात्रेकरु पहलगाम मार्गाने अम...

July 2, 2025 2:20 PM

views 34

विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जेनिक सिनर याने इटलीच्या लुका नार्डीचा केला पराभव

टेनिस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरच्या जेनिक सिनर याने विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या लुका नार्डी याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. आतापर्यंत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविचने फ्रेंच खेळाडू अलेक्झांड्रे मुलर विरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ४ सेटमध्य...

July 2, 2025 2:07 PM

views 46

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भूस्खलनात परतीचा मार्ग वाहून गेल्यामुळे २८ जूनपासून उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळ जानकी छट्टी गावात महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक अडकले ...

July 2, 2025 2:05 PM

views 32

महिला टी-२० क्रिकेटमध्ये, ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी केला पराभव

महिला टी-२० क्रिकेटमध्ये, काल रात्री ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सु...

July 2, 2025 1:57 PM

views 35

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष-भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

कोविडसाठीची लस आणि लसीकरणानंतर कमी वयाच्या लोकांचे अचानक झालेले मृत्यू, यांचा काहीही परस्परसंबंध नसल्याचा निष्कर्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रानं सखोल अभ्यासानंतर काढला आहे. भारतातली कोविडची लस ही अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं तसंच तिचे अत्यंत कमी प्रमाण...